Nagpur : नागपुरात नितीन गडकरींच्या स्टेजवर संजय दत्त म्हणाला कैसे है मामू..?

संजय दत्त याने आपल्या भाषणाची सुरुवातच कैसे है मामू? असा सवाल विचारत केली. त्यामुळे टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट पहायला मिळाला.

Nagpur : नागपुरात नितीन गडकरींच्या स्टेजवर संजय दत्त म्हणाला कैसे है मामू..?
Sanjay Dutt
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 17, 2021 | 8:19 PM

नागपूर : नागपुरात आजपासून सांस्कृतीक महोत्सवाची मेजवाणी सुरू झाली आहे. आज अभिनेता संजय दत्त याच्या हस्ते ‘खासदार सांस्कृतीक’ महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्य उपस्थिती होती. नागपुरात १७ ते २६ डिसेंबर पर्यंत ‘खासदार सांस्कृतीक’ महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील १० दिवस विविध सांस्कृतीक महोत्सवाची मेजवाणी असणार आहे.

संजय दत्त म्हणतो कैसे है मामू?

या वेळी संजय दत्त याने आपल्या भाषणाची सुरुवातच कैसे है मामू? असा सवाल विचारत केली. त्यामुळे टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट पहायला मिळाला. पुढे संजय दत्त म्हणाला मी विजय दर्डा यांना विचारलं एवढे लांब भाषण तुम्ही कसे देता, आम्ही डोयलॉग लिहून घेत असतो. मला भाषण देता येत नाही तेव्हा मी डायलॉग बोलतो. तुम्ही संजू सिनेमा पहिला असेल तर त्यातल्या दोन चार गोष्टी घ्या आणि आई वडिलांची इज्जत करणे शिका असेही तो म्हणाला. मुन्ना भाई-3 ची मी प्रतीक्षा करत असेही यावेळी संजय दत्तने सांगितले. गडकरींचे कौतुक करताना संजय दत्त म्हणाला, गडकरींसारखा नेता मी अजून बघितला नाही, माझ्या वडीलांनंतर ते गुण मी गडकरींमध्ये बघतो, जो नेता फक्त जनतेचा विचार करतो. अशा शब्दात संजय दत्तने गडकरींचे कौतुक केले आहे.

नितीन गडकरींकडूनही संजय दत्तचं कौतुक

संजय दत्त त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होते. संजय दत्त यांच्या जीवनात अनेक संकट आली अन्याय झाला. मात्र आता ते संकट टळलं आहे. संजू सिनेमाने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अतिशय मोठा कलाकार आहे संजय दत्त. सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचं मोठं योगदान आहे, अशा शब्दात गडकरींनी संजय दत्तचे कौतुक केले. भारतीय चित्रपट सृष्टीने देशाला मोठे संदेश दिले , हे समाज प्रबोधनाचे साधन आहे. अमिताभ बच्चन यांना मी भेटलो तेव्हा त्यांना आनंद सिनेमा बद्दल सांगितलं तो मी अनेकदा पहिला आहे, असे गडकरी म्हणाले. संजय दत्त यांना कॅन्सर झाला होता मात्र आता त्यांनी सांगितलं आता ते पूर्ण त्यातून मुक्त झाले. लोकांचा इतका प्रतिसाद आहे की आम्हाला डिजिटल प्रवेशिका देणं बंद करावे लागले, असेही गडकरींनी यावेळी सांगितले. विदर्भातील कलाकारांना यात आम्ही बोलावलं, त्यांना संधी दिली जात आहे. या आयोजनात माझे फोटो जास्त लावले ते मला आवडलं नाही, एक दोन फोटो ठीक आहे. अशा शब्दात गडकरींनी कानही उपटले.

Amazon चा बहुप्रतीक्षित Smartphone-TV सेल सुरु, Samsung, Xiaomi, Oppo च्या प्रोडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट

क्रेडिट कार्डची कुंडली; जाणून घ्या, क्रेडिट कार्डवरील छुप्या शुल्कांची माहिती

Hardik Patel in Pune | हार्दिक पटेलांची रोहित पवारांवर स्तुतिसुमनं, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें