AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे राज्य आपल्याला ताब्यात घ्यायचंय, आदित्य ठाकरे येणार, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात संजय राऊत गरजले!

पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बोलताना शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला हे राज्य ताब्यात घ्यायचं आहे. आदित्य ठाकरे येणार आहेत, असं म्हटलं आहे.

हे राज्य आपल्याला ताब्यात घ्यायचंय, आदित्य ठाकरे येणार, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात संजय राऊत गरजले!
Sanjay Raut Pune SpeechImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 7:57 PM
Share

एमपीएससी विद्यार्थी आंदोलनात पोहोचलेल्या संजय राऊतांनी जोरदार राज्य सरकार, निवडणूक आयोग आणि एमपीएससी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सांगितलं की, विद्यार्थी रस्त्यावर बसलेत. प्रत्येक जिल्ह्यात हीच स्थिती आहे. जेलमध्ये जायला तयार आहेत. पण हे जे सरकार आहे, तरुणांचं ऐकणार नसेल तर कोणाचं ऐकणार, तरुणांमध्ये देशात हवं ते करुन घेण्याची ताकद आहे. मला कळलं की तुमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण हे सरकार तुमचं असतं तर त्यांनी मागण्या समजून घेतल्या असत्या. पण विद्यार्थ्यांची मागणी आहे वरपासून खालपर्यंत शुद्धीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे सरकार निवडणुका आणि सरकार बनवताना भ्रष्टाचार करतंय. तिथं ज्ञानेश कुमार बसलेत इथं आणखी कुणी बसलं आहे. ज्ञानेश कुमारांना जावच लागेल. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत आत्मविश्वास आहे, तोपर्यंत कोणताही चुकीचा माणूस महत्त्वाच्या पदांवर बसवला जाणार नाही. जेव्हा देशाच्या तरुणांना जाग येते तेव्हा दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातील नेत्यांचे चेहरे बघा, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

तरुणांना अंधभक्त करण्याचा कारखाना चालवण्याचा काम हे करते. महाराष्ट्र मर्दांचा आहे. हे पुण्यात सुरु आहे. ते राज्यभारात झाले तर मुख्यमंत्री यांची गाडी मंत्रालयाच्या बाहेर निघू देणार नाही. तुंम्हाला सरळ करण्यासाठी आम्ही आहोत. आम्हाला तरुंगात टाकले. आमच्यामागे ईडी लावली. बाहेर आलो आणी तुमच्यावर पंजा टाकला. मंत्रायातले उंदिर तुंम्ही वाघाशी काय लढणार. दलिष शोषित मुलांना यांना पुढे येवु द्यायचे नाही. महाराष्ट्र शिवाजी महाराज, फुले, शाहु, आंबेडकरांचा आणी बाळासाहेब ठाकरे आणी शरद पवार साहेबांचा आहे. संघर्ष करायला आणी लाठ्या खायला मी सर्वात पुढे असेल. तुमच्या संघर्षाला भगवा सलाम. हा आपला महाराष्ट्र आहे. या गर्जना आहेत त्या देवेंद्र फडणवीस पर्यंत जाऊ द्या. या गर्जना त्यांच्या कानापर्यंत गेल्या आहेत पण त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. हे महाराष्ट्रातील जंतर मंतर आहे. जंतर मंतरचा पॅटर्न आहे घेतल्या शिवाय राहणार नाही. हजारो विद्यार्थी संघर्ष करतात, असं राऊतांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रशासन आयोगावर आहे. तुम्ही पिढीला बरबाद करायला निघाले. हे पाप कुठे फेडणार. राज्य व्हाईट कॉलर माफिया हाती द्यायचे काम सुरु आहे. या विद्यार्थी आंदोलनात आदित्य ठाकरेही येणार. तरुण मुलांच्या मागे आदित्य ठाकरे आहेत. हे राज्य आपल्याला ताब्यात घ्यायचे आहे. संघर्ष आणि लाठ्या खायला मी पुढं असेल. तुमच्या संर्घषाला माझा भगवा सलाम, असा प्रहार राऊतांनी केला आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात