गद्दार ज्ञानेश! पुण्यातील आंदोलनात आदित्य ठाकरे बरसले, ‘त्या’ दोघांच्या राजीनाम्यावर महत्त्वाचं विधान
आपण गद्दार ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच आणि भिमनवारांचाही राजीनामा घेणार म्हणजे घेणारच, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बोलत होते.

पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील आज रोहित पवारांच्या आंदोलनाला भेट दिली. केंद्र सरकार कोण चालवत आहे. भिमनवारच्या मागे कोण आहे. आपण गद्दार ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणारच आणि भिमनवारांचाही राजीनामा घेणार म्हणजे घेणारच, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ज्ञानेश कुमार आणि विवेक भिमनवारांवर टीकास्र
पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
त्या दोघांमुळे देशाचं भवितव्य खराब
तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे. एकच मागणी आहे आपली. कोणी राजीनामा दिला पाहिजे हे फडणवीस साहेब ऐकून घ्या. यावेळी विद्यार्थ्यांनी भिमनवार यांचं नानव घेतलं त्यावेळी आदित्य यांनी सांगितलं की भिमनवार हे फक्त प्यादे आहेत. मुद्दा आहे पण देशभरात एक आंदोलन सुरु आहे. ते म्हणजे ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचं. तुम्हाला कल्पना असेल राहुल गांधी, प्रियाकां गांधी आणि अन्य खासदारांना अटक करण्यात आली आहे.