मोठी बातमी! एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांना समिती गठीत करण्याची शिफारस

मोठी बातमी समोर येत आहे, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती राज्यपालांना केली आहे.

मोठी बातमी! एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांना समिती गठीत करण्याची शिफारस
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 4:33 PM

मोठी बातमी समोर येत आहे, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना केली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे शिफारस केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनंतर आता एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष तसचे सदस्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये घोळ सुरूच आहेत. यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला आता मोठं यश मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना केली आहे.

Loading...

दरम्यान दुसरीकडे एमपीएससीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये घोळ सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनीच सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यांनी यावेळी एमपीएससी मंडळावर काही गंभीर आरोप केले होते, हे मंडळच बरखास्त करण्यात यावं असं त्यांनी म्हटलं होतं. आपल्याकडील पुरावे आणि पत्र सीएमला देणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आता सरकारकडून मोठं पाउल उचलण्याची तयारी सुरू झाल्याचं दिसून येत आहे. फडणवीसांकडून राज्यपालांना समिती गठीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us