AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी… आदिती तटकरे यांची ट्विट करून मोठी घोषणा; सर्व पैसा…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी बातमी आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी... आदिती तटकरे यांची ट्विट करून मोठी घोषणा; सर्व पैसा...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
| Updated on: Jan 25, 2025 | 1:47 PM
Share

वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आले. जुलै ते डिसेंबर असे 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता या योजनेबाबत आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिली आहे.

जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,असे ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधि जमा झाल्याचे त्यांनी नमूद केलं. उद्यापर्यंत (26 जानेवारी) सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असेही त्यांनी नमूद केलं

आत्तापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे 1500 मिळून एकूण 9 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. तर जानेवारीचा हप्ताही आता जमा होत असून सात महिन्यांचे मिळून एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांना मिळतील.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर जानेवारी महीना अर्धा उलटून गेला तरीही पैसे मिळाले नव्हते,त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यासंदर्भात अदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात माहिती दिली होती. या योजनेचा जानेवारीचा हप्ता, ते पैसे 26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरु होईल, असे त्यांनी नमूद केले होते. त्याप्रमाणे आता कालपासून (24 जानेवारी) पात्र महिलांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

Follow Us
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद