Video : लोकांचा जीव गेला अन् अमित साटम यांना हसू आवरेना, मुंबईतील मॅनहोलच्या घटनेनंतर असंवेदनशीलतेचा कळस!

असलम शेख नावाची व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याने प्रशासाने कठोर कारवाई केली आहे. साकिनाका भागात ही घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Video : लोकांचा जीव गेला अन् अमित साटम यांना हसू आवरेना, मुंबईतील मॅनहोलच्या घटनेनंतर असंवेदनशीलतेचा कळस!
amit satam laughing
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 6:56 PM

Amit Satam Viral Video : मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या असंवदेनशीलतेचे दर्शन समस्त महाराष्ट्राला घडले आहे. दोन दिवसात मुंबईत पावसामुळे दोघांचा बळी गेला. पहिल्या दुर्घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत असलम शेख या व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आमदार तथा मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम चक्क हसताना दिसत आहेत. अमित साटम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी बाकावरचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसत आहेत.

दोन दिवसात दोन मृत्यूच्या घटना

विधिमंडळ परिसरातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अमित साटम या व्हिडीओत चक्क हसत असताना दिसत आहेत. मुंबईत झालेल्या दोन दुर्घटनांचा उल्लेख करून ते जयंत पाटील यांच्यासोबत बोलताना हासत आहेत. स्कुलबसवर झाड कोसळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. एका कुटुंबाने चिमुकला गमावला आहे. आज (2 जुलै) एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये मृत्यू झालेला असताना साटम मात्र हसत असल्याने संताप व्यक्त केला जातोय.

मृत्यूच्या घटनेवर बोलताना अमित साटम हसत आहेत

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अमित साटम यांनी मुंबईचा विकास केला जाईल. मुंबईत पाणी तुंबू दिले जाणार नाही, असे अनेक प्रकारचे आश्वासन देत होते. परंतु आता हेच अमित साटम आता मात्र दोन मृत्यूंच्या घटनेवर बोलताना हसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अमित साटम किती असंवेदनशील आहेत, असे म्हणत नाराजी व्यक्त केली जातेय.

चार अधिकाऱ्यांचे निलंबन

दरम्यान, असलम शेख नावाची व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याने प्रशासाने कठोर कारवाई केली आहे. साकिनाका भागात ही घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या आहेत.

Follow Us