व्हीआयपी दौऱ्यावेळीच रस्ते चकाचक का होतात? मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले, नेमकं काय घडलं?

कोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले आहे. व्हीआयपी दौऱ्यावेळीच रस्ते चकाचक का होतात? असा सवाल देखील कोर्टाने उपस्थित केला आहे.

व्हीआयपी दौऱ्यावेळीच रस्ते चकाचक का होतात? मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले, नेमकं काय घडलं?
mumbai high court
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 8:34 AM

मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला रस्त्याच्या स्वच्छतेवरून फटकारले आहे. व्हीआयपी दौऱ्यावेळीच रस्ते चकाचक का होतात? असा संतप्त सवाल कोर्टाने उपस्थित केलाय. सामान्य मुंबईकरांसाठी रस्ते दररोज स्वच्छ का नसतात, अशी विचारणा कोर्टाने केलीये. तुमची इच्छा असेल तर क्षणात परिस्थिती बदलू शकते, अशा शब्दात उच्च न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. केवळ दोन दिवसांचा देखावा न करता कायमस्वरूपी सुधारणा करावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

शाही पाहुण्यांसाठी रस्त्यांवर स्वच्छता होते. पण मुंबईकरांसाठी कचऱ्याचे साम्राज्य, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महापालिकेची खरडपट्टी केली. मुंबईतील रस्ते केवळ महत्त्वाच्या व्यक्ती किंवा राजघराण्यातील व्हीआयपींच्या भेटीच्या वेळीच चकाचक केले जात असल्यावरून न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. सामान्य नागरिकांसाठी अशी स्वच्छता अथवा चकाचक रस्ते दररोज का? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.

Loading...

इच्छा असेल, तर क्षणात परिस्थिती बदलू शकेल’ राज्य सरकार आणि महापालिकेकडे इच्छा असेल.  तर ते काही क्षणात परिस्थिती बदलू शकतात. हे मतप्रदर्शन आम्ही अनुभवातून करत आहोत.  बदल अत्यंत वेगाने घडू शकतात. मग, काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहरात येणार असतील,  तेव्हाच तुम्ही सक्रिय का होता? हे योग्य नाही. तुम्हाला या शहराचे कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या सामान्य माणसासाठी काम करावे लागेल, असे कोर्टाने सुनावले. दोन दिवसांचा हा तात्पुरता देखावा करण्याऐवजी कायमस्वरूपी सुधारणा करण्याचे न्यायालयाने सुनावले. दक्षिण मुंबईतील ‘बॅलार्ड इस्टेट’ येथे काही महत्त्वाचे पाहुणे या परिसराला भेट देणार असल्याने तो परिसर पूर्णपणे स्वच्छ करून घेण्यात आला होता.

मुंबईत काही दिवसांपूर्वी ब्रिटनचा राजकुमार विल्यम आणि राजकुमारी केट मिडलटन आले होते. ‘अर्थशॉट प्राइज पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. व्हीआयपी पाहुणे तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीदरम्यान राजकुमार विल्यम यांनी मुंबईच्या रस्त्यावर खेळाचा आनंद लुटला. प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकरसह गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us