या कालावधीत लोकल सेवा रद्द… रविवारच्या मेगा ब्लॉकचा टायमिंग पटकन चेक करा, नाहीतर घराबाहेर पडताच…
रविवारी मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक सकाळी १० ते सायंकाळपर्यंत असेल. यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल होऊन काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी, लाइफलाइन अर्थात रेल्वे, लोकल. 12 महिने तिचा अविरत प्रवास सुरू असतो, लाखो लोकांना इककडून तिकडे ती रोज नेत असते. मात्र देखभालीच्या कामासाठी रेल्वेवर अध्येमध्ये ब्लॉक घेतला जातो, दुरूस्ती केली जाते. या रविवारी देखील मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे .
मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ दरम्यान मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सकाळी १०:४८ ते दुपारी ३:४५ वाजेपर्यंत मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेलवुिवारी. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी- चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान, सकाळी ११:४० ते सायंकाळी ४:४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वाशी / बेलापूर / पनवेल दरम्यानच्या हार्बर सेवा रद्द असतील. एवढंच नव्हे तर तसेच सीएसएमटी – वांद्रे / गोरेगावदरम्यानच्या सेवा रद्द राहतील. पश्चिम रेल्वेमार्गावर सांताक्रुझ -गोरेगाव अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
तिन्ही मार्गांवर बदललं गाड्यांचं वेळापत्रक
रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मुंबईतील तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदललं आहे. विविध अभियांत्रिकी कामं, रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यानुसार, मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत सीएसएमटी -विद्याविहार या स्थानकांदरम्यान ब्लॉक असून, गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
तर हार्बर मार्ग मार्गावर सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत असणार आहे. सीएसएमटी चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल.
या कालावधीत लोकल सेवा रद्द
– पश्चिम रेल्वे वर सांताक्रूझ – गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत ब्लॉक असेल
– ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवल्या जातील.
याव्यतिरिक्त, या ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील, तर, बोरिवली आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून केवळ गोरेगावपर्यंतच चालवण्यात येतील.