AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ

सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याची वृत्त नाही. लोक काही क्षण भीतीने घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नंतर परिस्थिती नॉर्मल झाली.

महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
महाराष्ट्रात भूकंपImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 11, 2026 | 9:35 AM
Share

आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वाशिम शहरातील काही भागांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरात आणि नांदेड शहर व परिसरात हे हलके धक्के बसले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्यानंतर जमीन हलल्यासारखे जाणवले. नांदेडमध्ये हा धक्का ८ वाजून ४६ मिनिटांनी जाणवला.

कोणकोणत्या भागात जाणवले धक्के?

वाशिम शहर – वाशिम शहर आणि आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी 8 वाजून 45 मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला.

यवतमाळ जिल्हा – यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेबाळपिंपरी भागात 8 वाजून 45 मिनिटाने भूकंपाचे धक्के जाणावले.

नांदेड शहर व परिसर – नांदेड शहर आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का 8 वाजून 46 मिनिटांनी जाणवला.

सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याची वृत्त नाही. लोक काही क्षण भीतीने घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नंतर परिस्थिती नॉर्मल झाली.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) कडून अद्याप अधिकृत मॅग्निट्यूड आणि केंद्रबिंदूची माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्थानिक नागरिकांच्या अनुभवांनुसार हा धक्का अतिशय हलका होता. भूकंपप्रवण क्षेत्र मानल्या जाणाऱ्या विदर्भ-मराठवाडा भागात असे सौम्य धक्के अधूनमधून जाणवत असतात. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.