मुंबई पोलिसांकडून शिका, दिल्ली पोलिसांना ट्विटरवर सल्ला, #MumbaiPolice ट्रेडिंग, बुल्लीबाई केसचं काय आहे कनेक्शन?

| Updated on: Jan 04, 2022 | 5:02 PM

पोलिसांनी अवघ्या 36 तासांत बंगळुरुहून एका तरुणाला या प्रकरणात अटक केलं. या कारवाईनंतर आता मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं जात आहे. मात्र दुसरीकडे दिल्ली पोलिसांवर टीकादेखील होत आहे. सोशल मीडियावर सध्या #MumbaiPolice हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगवर आहे.

मुंबई पोलिसांकडून शिका, दिल्ली पोलिसांना ट्विटरवर सल्ला, #MumbaiPolice ट्रेडिंग, बुल्लीबाई केसचं काय आहे कनेक्शन?
MUMBAI POLICE BULLI APP
Follow us on

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी सुल्ली डिल आणि बुल्लीबाई या अॅपवर मुस्लीम महिलांची बोली लावली जात असल्याचा आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. मलिक यांच्या आरोपांनतर मुंबई पोलीस लगेच अॅक्शन मोडमध्ये आले. पोलिसांनी अवघ्या 36 तासांत बंगळुरुहून एका तरुणाला या प्रकरणात अटक केलं. या कारवाईनंतर आता मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं जात आहे. मात्र दुसरीकडे दिल्ली पोलिसांवर टीकादेखील होत आहे. सोशल मीडियावर सध्या #MumbaiPolice हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगवर आहे.

नेटकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दाखवला आरसा 

मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणाशी संबंधित एका तरुणाला बंगळुरु येथून ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे. याच कारणामुळे समाजमाध्यमांवर मुंबई पोलिसांचा दाखला देत दिल्ली पोलिसांना सध्या आरसा दाखवला जातोय. जे काम दिल्ली पोलीस करु शकले नाही. ते काम मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांत करुन दाखवले असे नेटकरी म्हणत आहेत.

 

बुल्लीबाई  नेमकं काय प्रकरण आहे ?

काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराने त्यांचा फोटो सार्वजनिक करुन त्यांच्या नावाची बोली लावली जात असल्याची माहिती समाजमाध्यमावर सांगितली होती. तसेच याबाबत दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल करुन याचा तपास करावा अशी मागणीदेखील या महिला पत्रकाराने केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकारणाचा तपास सुरु केला होता. तसेच दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकासमंत्री यांनी नवाब मलिक यांनी बुल्लीबाई अॅपप्रमाणेच सुल्ली डील या अॅपवरदेखील मुस्लीम महिलांची बोली लावली जात असल्याची माहिती दिली होती.

 

त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु करुन 21 वर्षीय इंजिनिअर तरुणाला अटक केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मुंबई पोलिसांची वाहवा केली जात आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांना धडे दिले जातायत.

 

इतर बातम्या :

विवाहित प्रेयसीसोबत नगरहून कोल्हापूर गाठलं, धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त

25 वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या, ऊसाच्या शेतात मृतदेह आढळला

Aurangabad: लाखोंचे कॅमेरे घेऊन निघालेला फोटोग्राफर गायब, भावाची तर वेगळीच तक्रार, पोलिसांसमोर आव्हान