25 वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या, ऊसाच्या शेतात मृतदेह आढळला

25 वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या, ऊसाच्या शेतात मृतदेह आढळला
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

कार्वे ते कोरेगाव रस्त्यावर भैरोबा मंदिराशेजारील ऊसाच्या शेतात सोमवारी सकाळी युवतीचा मृतदेह सापडला होता. परिसरातून जाणाऱ्या रहिवाशांना मृतदेह आढळताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 04, 2022 | 11:00 AM

सातारा : 25 वर्षीय युवतीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील कार्वे ते कोरेगाव मार्गावर ही घटना घडली. रस्त्याच्या लगत असलेल्या ऊसाच्या शेतता युवतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

ऊसाच्या शेतात युवतीचा मृतदेह

संबंधित युवतीची अद्यापही ओळख पटलेली नाही. घटनास्थळी कराड पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. कार्वे ते कोरेगाव रस्त्यावर भैरोबा मंदिराशेजारील ऊसाच्या शेतात सोमवारी सकाळी युवतीचा मृतदेह सापडला होता. परिसरातून जाणाऱ्या रहिवाशांना मृतदेह आढळताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

युवतीची ओळख पटली नाही

पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यावेळी अंदाजे 25 वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याचे स्पष्ट झाले. मयत युवतीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्वे ते कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिर आहे. त्याजवळ उसाच्या शेतात तरुणीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक आनदराव खोबरे, फौजदार भैरवनाथ कांबळे, भरत पाटीलसह पोलिस कर्मचारी पोहोचले.

संबंधित बातम्या :

युवतीचे तीन भाषांवर प्रभुत्व, दोन विषयांत एम. ए.; घरची परिस्थिती सधन, तरीही का करते चोऱ्या?

लाखोंचे कॅमेरे घेऊन निघालेला फोटोग्राफर गायब, भावाची तर वेगळीच तक्रार, पोलिसांसमोर आव्हान

वासनांध वृद्धाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हिडीओ शूट करणाऱ्या सुनेवर नजर पडताच…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें