वासनांध वृद्धाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हिडीओ शूट करणाऱ्या सुनेवर नजर पडताच…

वासनांध वृद्धाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हिडीओ शूट करणाऱ्या सुनेवर नजर पडताच...
प्रातिनिधिक छायाचित्र

मानवतेला लाज आणणारी ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून समोर आली आहे. कलियुगी वृद्धाने चक्क निष्पाप कुत्र्यावर बलात्कार केला. कुत्र्यासोबत लैंगिक शोषण करणाऱ्या वृद्धाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याचा प्रयत्न सुनेने केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 04, 2022 | 9:48 AM

लखनौ : माणुसकीला काळिमा फासणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताना दिसतात. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये असाच काहीसा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. 60 वर्षांच्या वृद्धाने चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याची निंदनीय घटना उघडकीस आली आहे. सासऱ्यांची कृष्णकृत्य जगासमोर आणण्यासाठी सुनेने या घटनेचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी वृद्धाने तिलाही मारहाण केल्याचा आरोप आहे.

सुनेला सासऱ्याची मारहाण

मानवतेला लाज आणणारी ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून समोर आली आहे. कलियुगी वृद्धाने चक्क निष्पाप कुत्र्यावर बलात्कार केला. कुत्र्यासोबत लैंगिक शोषण करणाऱ्या वृद्धाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याचा प्रयत्न सुनेने केला. इतक्यात सासऱ्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तो त्याच अवस्थेत तिच्या दिशेने धावला आणि तिच्या हातातून मोबाईल खेचण्याचा प्रयत्न करु लागला. वृद्धाने महिलेला मारहाण केल्याचाही दावा केला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये वृद्ध आणि त्याची सून यांच्यामध्ये हाणामारी होताना दिसत आहे.

पशुप्रेमीच्या मदतीने सासऱ्यावर कारवाई

यानंतर सुनेने पीपल फॉर अॅनिमल (People For Animal – PFA) या पशुप्रेमी आणि संरक्षक संस्थेशी संपर्क साधला. सासऱ्याच्या कृष्णकृत्यांचा पाढा सुनेने या संस्थेच्या सदस्यांपुढे वाचला. त्यानंतर पशुप्रेमी संस्थेच्या टीमने पुढील सूत्रं हाती घेतली. पोलिसांनी 60 वर्षीय आरोपीला अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. वृद्धाने यापूर्वीही अशाप्रकारचे कृत्य केल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, व्हिडीओवरुन केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आरोपी वृद्धावर भादंवि कलम 377 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

कळमेश्वरमध्ये घरगुती वाद गेला विकोपाला; बहिणीला का संपविले भावानेच?

स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न, रेल्वे अधिकाऱ्यामुळे बचावले प्राण

ट्रेनमधून बाळ नदीत कोसळलं, लेकाला वाचवताना आईही पडली, भंडाऱ्यात हृदयद्रावक घटना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें