Sulli Deal | मुस्लीम महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, ‘सुल्ली डील’ नेमका प्रकार काय ?

Sulli Deal | मुस्लीम महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, 'सुल्ली डील' नेमका प्रकार काय ?
rupali chakankar

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या 'गिटहब' या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

योगेश बोरसे

| Edited By: prajwal dhage

Jan 02, 2022 | 2:25 PM

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. मलिक यांच्या माहितीनंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

‘गिटहब’ विरुद्ध कारवाई करा, माहिती सोशल मीडियावरुन काढून टाका 

“सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत; असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते. या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत,” अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

नवाब मलिक यांनी कोणती माहिती दिली ?

“सुल्ली डील नावाचे एक पोर्टल आहे. या पोर्टलवर महिलांचे फोटो लावले जातात. तसेच त्यांची तिथे बोली लावली जाते. यामध्ये बहुतांश मुली या अल्पसंख्याक समजाच्या आहेत. काही चुका घडत असतील तर त्याबाबत आपले मत मांडणाऱ्या मुलीचे चिरहरण केले जात आहे. या घटनेची मी निंदा करत आहे. मी गृहमंत्र्यांना पत्र लिहणार आहे. तसेच पोर्टल चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. महिलांचा लिलाव करण्यासाठी त्यांची माहिती पोर्टलवर टाकणे हा गुन्हा आहे,” असे मलिक म्हणाले होते.

सुल्ली डील अॅप काय आहे ?

सुल्ली डील या अॅपवर मुख्यत्वे मुस्लीम महिलांना टार्गेट केले जात आहे. याआधी Bulli Bai या अॅपवरसुद्धा अशाच प्रकारे मुस्लीम महिलांना टार्गेट केले जात होते. सुल्ली डील अ‌ॅपवर ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या महिलांवर घाणेरड्या कमेंट्स केल्या जातात. येथे त्यांची बोलीदेखील ठरवली जाते. Github वर या प्लॅटफॉर्मवर या अॅपला लॉन्च करण्यात आले आहे.

इतर बातम्या :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें