Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

Section 144 in Mumbai : मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली. पुढील 15 दिवसासाठी जमावबंदी लागू करण्यात आली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश हे लागू करण्यात आली आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?
Section 144 in Mumbai
| Updated on: Jul 20, 2026 | 2:13 PM

सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. अभिजीत दिपके यांचा मोर्चा थेट संसद भवनाकडे पोहोचला आहे. अभिजीत दिपके यांचे समर्थक मोठ्या संख्येने दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज थेट मोर्चा निघाला आहे. संसद भवनाचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आले. संसद भवनातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांकडून आंदोलकांना रोखले जातंय. संसद भवनाची सर्व प्रवेशव्दार पूर्ण बंद करण्यात आली. आंदोलन चिघळल्याचे बघायला मिळतंय. काही आंदोलक संसद भवनापासून 150 किलोमीटर अंतरावर आहेत. अमित शाह यांच्या भेटीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पोहोचले आहेत. मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली. पोलिसांचे म्हणणे आहे की, मुंबईत नव्याने जमावबंदी नाही.

मुंबईत पुढील 15 दिवसासाठी जमावबंदी

मुंबई पोलिसांकडून झालेले आदेश कायमस्वरूपाचे. दर 15 दिवसांनी मुंबई पोलिसांकडून हे आदेश जारी केले जातात, असे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे. पुढील 15 दिवसासाठी जमावबंदी लागू करण्यात आली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश हे लागू करण्यात आली आहेत. 23 जुलैपासून 03 ऑगस्टपर्यंत जमावबंदी मुंबईत लागू करण्यात आली.

23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट पर्यंत आदेश

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता भंग होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मिरवणुकांवर बंदी, वाद्यवृंद तसेच फटाके फोडण्यासही मनाई

पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असून मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक, वाद्यवृंद तसेच फटाके फोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.

विवाह समारंभ, अंत्ययात्रा, कंपन्या व सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका यांना आदेशातून सुटका 

विवाह समारंभ, अंत्ययात्रा, कंपन्या व सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाज यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. झोनल पोलीस उपायुक्त किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने काही सभा किंवा मिरवणुकांना परवानगी दिली जाऊ शकते. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे

Follow Us