AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा

कॉकरोच जनता पार्टीकडून मोठा दावा करण्यात आला आहे, अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचले आहेत.

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा
अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 3:10 PM
Share

राजधानी दिल्लीमधून मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) चं आंदोलन आता चांगलंच पेटलं आहे. आंदोलक संसद भवनच्या जवळ पोहोचले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याचदरम्यान आता कॉकरोच जनता पार्टीकडून मोठा दावा करण्यात आला आहे, अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. कॉकरोच  जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास यांनी दावा केला आहे, अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं सौरव दास यांनी? 

अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, असा दावा सौरव दास यांनी केला आहे, तसेच विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरावं, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा द्यावा असं आवाहान यावेळी दास यांच्याकडून करण्यात आलं आहे. आता हे आंदोलन अधिकच पेटलं असून, आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत  आहे.

धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला

आंदोलक संसद भवनच्या जवळ पोहोचले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याचदरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. काही वेळापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीकडून असा दावा करण्यात आला होता की, सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार आहे, त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपलं उपोषण देखील मागे घेतलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा हा संसदेमध्ये पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी संसद भवन परिसरात अनेक ठिकाणी बॅरिकेड लावले होते, परंतु आंदोलकांनी बॅरिकेड पार केले आहेत. त्यानंतर आता आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यातच आता अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...