Mumbai Section 144 | मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरात आठ दिवसांची जमावबंदी, न्यू इयर पार्ट्यांनाही चाप

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.

Mumbai Section 144 | मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरात आठ दिवसांची जमावबंदी, न्यू इयर पार्ट्यांनाही चाप
अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले 1 कोटी खर्च
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 9:44 AM

मुंबई : मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कलम 144 लागू करण्याची घोषणा गुरुवारी केली. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत (7 जानेवारी) मुंबईत जमावबंदी (Section 144) लागू असेल. त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही.

पार्टी-सेलिब्रेशनला बंदी

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.

काय आहेत आदेश?

“30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील” असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.

मुंबईत वाढती कोरोना रुग्णसंख्या

मुंबईत बुधवारी 2,510 नवीन कोव्हिडग्रस्त रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत 8,060 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. सध्या मुंबईतील 45 इमारती सील आहेत.

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी (Aditya Thackarey) महानगरपालिका मुख्यालयात महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यासाठी आता नियमांचं काटेकोर पालन होणं गरजेचं असल्यानं काही गोष्टी पालिकेनं ठरवल्या आहेत.

इतर बातम्या –

Corona : मुंबईकरांना धडकी, कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे रुग्ण

 मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? 9 दिवसातली रुग्णवाढ नाकी नऊ आणणारी

आता खैर नाही! नियम मोडणाऱ्यांवर कशी करणार कारवाई? BMCनं तयार केला ऍक्शनप्लॅन