यंदा मुंबईवर दुहेरी संकट, भरसमुद्रात उंचच उंच लाटांचा खेळ, मुसळधार पाऊस आल्यास…. किती दिवस धोक्याचे?
मुंबईत मान्सूनमध्ये समुद्राचे सौंदर्य खुलते, पण वाढत्या पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता असते. यंदा 24 वेळा मोठी भरती येणार असून, पालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे. 16 जुलैला सर्वाधिक 4.89 मीटरची लाट अपेक्षित आहे. समुद्राजवळ पावसाचा आनंद घेताना सुरक्षितता महत्त्वाची आहे, विशेषतः भरतीच्या वेळी. मुंबईकरांनी या वेळापत्रकाकडे लक्ष देऊन सुरक्षित राहावे.

मुंबई आणि पावसाळा.. मान्सूनमध्ये मुंबईच रूप तर खुलतंच पण वाढत्या पावसामुळे अनेकदा रस्त्यांवर पाणी साचणं, वाहतूक ठप्प होणं वगैरेही प्रकार घडत असतात. असं असलं तरी पावसाची मजा घेण्यासाठी मुंबईकर नेहमी सज्ज असतात, पाऊस सुरू झाला की अनेकांची पावलं तर समुद्राकडे हमखास वळतात. ढगांतून बरसणारा मुसलधारा पाऊस, समोर उधाणलेला समुद्र आणि हातात चहा किंवा भुट्टा.. असा पाऊस एन्जॉय करायला अनेकांना आवडतं. पण याच पावसात समुद्राजवळ जाताना काळजीही घेतली पाहिजे, कारण मोठी भरती येण्याची शक्यता असते. अशावेळी समुद्रापासून , पाण्यापासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात येतं.
दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात समुद्रात तब्बल 24 वेळा मोठी भरती येणार आहे. यावेळी साडेचार मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळतील अशी माहिती समोर आली आहे. पालिकेने पावसाळ्यातील भरती ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
कधी येणार सर्वात मोठी भरती ?
16 जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी भरती येणार आहे. त्यावेळी समुद्रामध्ये 4.89 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर त्याखालोखालची भरती ही 16 जूनला आहे, त्यावेळी समुद्रात 4.87 मीटरच्या उंच लाटा उसळतील. यंदाच्या पावसळ्यातील भरती ओहोटीचे वेळापत्रक पालिकेतर्फे जाहीर करण्यात आलं आहे.
यंदाच्या पावसाळ्यात 24 वेळा मोठी भरती येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग सहा दिवस मोठी भरती असेल. चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्यामुळे भरती ओहोटीच्या वेळा या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
जून व जुलै महिन्यातील भरती
जून आणि जलै महिन्यातील भरतीचं वेळापत्रक खालीलप्रमाणे –
रविवार 14 जून, सोमवार 15 जून, मंगळवार 16 जून, बुधवार 17 जून, गुरुवार 18 जून, शुक्रवार 19 जून असे 6 दिवस भरती असणार आहे.
त्यापैकी 16 जून रोजी – 4.87 मीटर,
17 जून – 4.86 मीटर उंचीच्या लाटा उसळतील.
तर त्यानंतर पुढल्या महिन्यात, म्हणजेच..
15 जुलैला 4.85 मीटर उंचीच्या लाटा
आणि 16 जुलै रोजी सर्वाधिक म्हणजेच 4.89 मीटर उंचीच्या लाटा उसळतील अशी माहिती समोर आली आहे.