अबब…१.१ अब्ज प्रवाशांची वाहतूक,देशाचे पहिले PPP मॉडेल, मुंबई मेट्रो वनचा ११ वा वर्धापन दिन

सध्या सोमवार ते शुक्रवार या कामाकाजाच्या दिवसात दररोज ५ लाख प्रवासी मुंबई मेट्रो वनमधून प्रवास करीत आहेत आतापर्यंतची सर्वोच्च दैनंदिन प्रवासी संख्या ५.४७ लाख प्रवासी इतकी आहे. त्यामुळे मेट्रोचे डब्बे वाढविण्याची मागणी होत आहे.

अबब...१.१ अब्ज प्रवाशांची वाहतूक,देशाचे पहिले PPP मॉडेल, मुंबई मेट्रो वनचा ११ वा वर्धापन दिन
Mumbai Metro One Private Limited (MMOPL)
| Updated on: Jun 07, 2025 | 6:45 PM

घाटकोपर – वर्सोवा मेट्रो वन सेवेला उद्या ८ जून रोजी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई शहरातील उपनगरीय लोकल मार्ग उत्तर ते दक्षिण असा बांधलेला आहे. त्यामुळे शहरातील पहिल्याच ईस्ट आणि वेस्ट कॉरिडॉरमुळे या घाटकोपर – वर्सोवा मेट्रो वन सेवेला पहिल्या दिवसापासूनच तुडूंब प्रतिसाद लाभला आहे. गेल्या ११ वर्षात मुंबई मेट्रो वनने १११ कोटी ( १.१ अब्ज ) प्रवाशांची वाहतूक केली आहे. हा देशातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनर PPP शिपमधला पहिलाच प्रकल्प आहे.

मुंबई मेट्रो वनच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड तिच्या आजवरच्या प्रवासातील माईल स्टोन जाहीर केले आहेत. या काळात १२.६ लाख ट्रेन फेऱ्या आणि १.४५ किलोमीटरचे अंतर कव्हर झाले असून या काळात मुंबई वन मेट्रोच्या वक्तशीर पणाची टक्के वारी ९९.९९ टक्के राहीली आहे. आणि गाड्या उपलब्धतेचे प्रमाण ९९.९६ टक्के इतके राहीले आहे.

घाटकोपर स्थानकात सर्वाधिक प्रवासी

घाटकोपर वर्सोवा मार्गावर एकूण १२ स्थानके आहेत. आता या स्थानका सर्वाधिक प्रवाशी घाटकोपर स्थानकातून मिळाले असून ( सुमारे ३० कोटी ) त्यांच्या दुसरे स्थान अंधेरी स्थानकाला ( सुमारे २३ कोटी ) मिळाले आहे. तर साकीनाका स्थानकाचा ( सुमारे ११ कोटी ) तिसरा क्रमांक आला आहे. सध्या कामकाजाच्या दिवसात दररोज ५ लाख प्रवासी मेट्रो वनमधून प्रवास करीत असून आतापर्यंत सर्वोच्च दैनंदिन प्रवासी संख्या ५.४७ लाख प्रवासी इतकी आहे.

 शॉर्ट लूप सर्व्हीस सुरु

पिक अवरच्या वाढत्या गर्दीला दिलासा देण्यासाठी Mumbai Metro One Private Limited (MMOPL)  ने शॉर्ट लूप सर्व्हीस देखील सुरु केली आहे. ही सेवा घाटकोपर ते अंधेरी या गर्दीच्या स्थानकात चालविण्यात येते. मेट्रो मार्गिका Line 2A च्या D N Nagar स्थानक, Line 7 चे Western Express Highway स्थानक आणि Line 3 चे Marol Naka स्थानकात मुंबई मेट्रो वनचे इंटरचेंज पॉईंट निर्माण झाल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे.