शनिवारी आणि रविवारी पश्चिम रेल्वेवर 11 तासांचा मेगाब्लॉक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : लोअर परळ स्थानकावरील पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. हा ब्लॉक चर्चगेट ते दादर दरम्यान शनिवारी 2 फेब्रुवारीला घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री 10 वाजेपासून ते 3 फेब्रुवारी रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल चालवण्यात येणार नाही. या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील जलद […]

शनिवारी आणि रविवारी पश्चिम रेल्वेवर 11 तासांचा मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us on

मुंबई : लोअर परळ स्थानकावरील पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. हा ब्लॉक चर्चगेट ते दादर दरम्यान शनिवारी 2 फेब्रुवारीला घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री 10 वाजेपासून ते 3 फेब्रुवारी रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल चालवण्यात येणार नाही.

या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील जलद मार्गावरील सर्व लोकल विरार, डहाणू ते दादरपर्यंत चालविण्यात येतील. चर्चगेट ते दादर यादरम्यान जलद मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. तसेच सर्व धिम्या लोकल बोरीवली, भाईंदर, विरार ते वांद्रेपर्यंत चालविण्यात येतील. काही लोकल आणि मेल, एक्स्प्रेसच्या वेळेत, मार्गात बदल करण्यात आला आहे. तर अनेक लोकल सेवा आणि मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

या मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी चर्चगेट ते दादर या मार्गावर बेस्टकडून विशेष बसेस चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बसेस चालवण्यात येणार आहेत. या बसेस चर्चगेट ते दादर दरम्यान धावतील. मरीन लाईन्स, चर्नीरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर या बसेसचा थांबा असेल.

2 फेब्रुवारी शनिवारी रात्री 9.30 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत या विशेष बस धावतील. त्यानंतर 3 फेब्रुवारी रविवारी पहाटे 3.30 ते सकाळी 10 वाजेपर्यंत या बसेस धावतील.