मुंबई पोलिसात 5 नवे खतरनाक पहारेकरी!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई: मुंबई पोलिसांच्या पथकात आता पाच नव्या सैनिकांचा समावेश झाला आहे. हे पाच मित्र आता मुंबई पोलिसांना तपासकामात मदत करणार आहेत. या पाच नव्या सैनिकांमुळे मुंबई पोलिसांची शान नक्कीच वाढणार आहे. हे पाच बेल्जिअम शेफर्ड कुत्रे आहेत. इतकंच नाही तर श्वान पथकात प्रथमच 5 महिला ट्रेनर म्हणून नेमण्यात आल्या आहेत. या ट्रेनर या 5 श्वानांना […]

मुंबई पोलिसात 5 नवे खतरनाक पहारेकरी!
Follow us on

मुंबई: मुंबई पोलिसांच्या पथकात आता पाच नव्या सैनिकांचा समावेश झाला आहे. हे पाच मित्र आता मुंबई पोलिसांना तपासकामात मदत करणार आहेत. या पाच नव्या सैनिकांमुळे मुंबई पोलिसांची शान नक्कीच वाढणार आहे. हे पाच बेल्जिअम शेफर्ड कुत्रे आहेत. इतकंच नाही तर श्वान पथकात प्रथमच 5 महिला ट्रेनर म्हणून नेमण्यात आल्या आहेत. या ट्रेनर या 5 श्वानांना प्रशिक्षण देणार आहेत.

श्वान म्हणजे माणसाच्या जवळचा अतिशय प्रामाणिक प्राणी. इतिहासातसुद्धा याची महती वर्णिली गेली आहे. अत्यंत जवळचा आणि प्रिय असणारा प्राणी. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात तसे अनेक श्वान आहेत. मात्र आता यामध्ये नव्या पाच श्वानांची भर पडली आहे. कर्तव्यदक्षेतेमुळे मुंबई पोलीस दलात 5 बेल्जिअम शेफर्ड श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना पाच महिला ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत. प्रियंका अमर भोई, राजेश्री देवराम थुबे, सुरेखा भानुदास लोंढे, लक्ष्मी केशव ताटके, चारुशीला विलास गर्दी या 5 महिलांची ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बेल्जियम शेफर्ड हे अतियश हुशार प्रजातीचे श्वान म्हणून ओळखले जातात. यांचा वापर तपास यंत्रणेसाठी करण्यात येणार आहे.

या श्वानांची वैशिष्ट्ये

  • बेल्जिअम शेफर्ड हे खूप ताकदवान आहेत
  • हुशार श्वानांमध्ये त्यांची गणती केली जाते.
  • जास्त काळ काम करण्याची त्यांची क्षमता आहे.
  • अतिसंवेदनशील तपासाचा शोध करण्यासाठी उपयुक्त
  • राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या ताफ्यातही यांचा समावेश आहे

मुंबई पोलिसांनी याआधी मोठमोठ्या गुन्ह्यांचा शोध हा श्वानांच्या मदतीने लावलेला आहे. आता या बेल्जिअम शेफर्डच्या मदतीने पोलिस यंत्रणेला नवं बळ मिळणार आहे.