AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीमार्फत कारवाई, यामागे भाजपची राजकीय सूडबुद्धी; नवाब मलिकांचा आरोप

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने आणि राजकीय हेतूने घडतंय असा आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीमार्फत कारवाई, यामागे भाजपची राजकीय सूडबुद्धी; नवाब मलिकांचा आरोप
नवाब मलिक
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 30, 2021 | 5:15 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने आणि राजकीय हेतूने घडतंय असा आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. (Action against Mahavikas Aghadi leaders through ED is BJP’s political revenge says Nawab Malik)

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे, त्यावरुन नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.

ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्या पध्दतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते, असेही नवाब मलिक म्हणाले.

ईडीकडून भावना गवळींच्या 5 ठिकाणांवर धाडी

शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawli) यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.

ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.

अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबद्दलची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिलीय. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

इतर बातम्या

ED Raid: शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, नोटीस न येताच ईडीच्या चौकशा सुरू; भावना गवळींचा गंभीर आरोप

VIDEO: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंची खोचक टीका

(Action against Mahavikas Aghadi leaders through ED is BJP’s political revenge says Nawab Malik)

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...