Mumbai Watermelon Death : बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर काय म्हणतात?

Mumbai Watermelon Death : सध्या सगळीकडे बिर्याणी त्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? याची चर्चा आहे. मुंबईत पायधुनी भागात हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर, आहारतज्ज्ञ यावर काय म्हणतात? कलिंगड खाण्याची योग्य वेळ कुठली? या बद्दल जाणून घ्या.

Mumbai Watermelon Death : बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर काय म्हणतात?
Mumbai Family Watermelon Death
| Updated on: May 05, 2026 | 4:31 PM

सध्या मुंबईत पायधुनी येथे घडलेल्या घटनेची सगळीकडे चर्चा आहे. महाराष्ट्रात सगळ्यांनाच यामुळे धक्का बसला आहे. शनिवारी 25 एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबाने रात्री साडेदहाच्या सुमारास बिर्याणी खाल्ली. त्यानंतर ते घरी आले. रात्री एकच्या सुमारास मुलांना पुन्हा भूक लागली. म्हणून त्यांनी कलिंगड कापून खाल्लं. त्यानंतर चौघांना पहाटेच्या सुमारास उलट्या-जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांना त्रास सुरु झाला. यामध्ये अचानक चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू कसा होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अन्नातून विषबाधेचा संशय व्यक्त केला आहे. चौघांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण तिथे त्यांचा मृत्यू झाला. जेजे मार्ग पोलीस स्टेशनने अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. बिर्याणीमुळे अन्नातून विषबाधा होणं ही असामान्य बाब नाहीय....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us