Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला आहे.
मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून अनेक ठिकाणी कापलेले धान शेतात तसेच मळणीसाठी ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे शेती पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही बदलत्या हवामानाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Jun 12, 2026 05:58 PM
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय..
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...

