AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार? बॉलिंग कोच मोर्ने मोर्कल काय म्हणाला?

IND vs AFG 1st ODI : विराट कोहली याला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसातील अंतिम सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे विराटला अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजमधून माघार घ्यावी लागली आहे.

IND vs AFG : विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार? बॉलिंग कोच मोर्ने मोर्कल काय म्हणाला?
Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 13, 2026 | 3:22 AM
Share

अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा हा देखील एकदिवसीय मालिकेचा भाग आहे. त्यामुळे चाहते रोहितची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र भारताचा दुसरा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हाच प्रश्न टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल यांना विचारण्यात आला. त्यांनी काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात.

विराटला दुखापत, यशस्वी जैस्वाल याचा समावेश

अवघ्या काही दिवसांपूर्वी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार पार पडला. आरसीबीने गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग दुसर्‍यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. विराटला या महाअंतिम सामन्यात दुखापत झाली. विराटला याच दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे विराटच्या जागी भारतीय संघात युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याचा समावेश करण्यात आला. मात्र प्लेइंग ईलेव्हनमध्ये यशस्वीलाच संधी मिळेलच, हे निश्चित नाही. मोर्ने मोर्कल याने काय म्हटलं हे जाणून घेऊयात. विराट वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानी खेळतो.

मोर्ने मोर्कलने काय म्हटलं?

“विराट नसल्याने आम्हाला त्याची फार उणीव भासणार आहे, कारण तो मधल्या फळीतील फलंदाजीचा प्राण आहे. विराटला अनुभवी खेळाडू म्हणून कसं खेळ करायला हवा हे माहित आहे. मात्र आम्ही दुखापतीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. आता विराट नसल्याने इतर खेळाडूंना संधी आहे. विराटच्या अनुपस्थितीत कोणता खेळाडू योगदान देतो हे पाहावं लागेल. विराटच्या जागेसाठी ईशान किशन, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात चुरस आहे. येत्या सामन्यांत आम्ही खेळाडूंना संधी देऊ. तसेच कोणता खेळाडू कोणत्या स्थानी खेळण्यास सक्षम आहे हे पाहू”, असं मोर्ने मोर्कलने स्पष्ट केलं.  मोर्नेने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं. त्यामुळे आता विराटच्या जागी, यशस्वी, केएल आणि इशान या तिघांपैकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका