AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या

India vs Afghanistan 1st Odi Live Streaming : शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया शनिवारी 13 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जाणून घ्या या सामन्याबाबतची महत्त्वाची माहिती.

IND vs AFG : टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
Rohit Rishabh IND vs AFGImage Credit source: Bcci
| Updated on: Jun 13, 2026 | 2:22 AM
Share

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघ एकमेव कसोटी सामन्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या द्विपक्षीय मालिकेचा 13 जूनपासून श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाने याआधी अफगाणिस्तानवर शुबमन गिल याच्या नेतृत्वात एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाकडून चाहत्यांना अशाच मोठ्या विजयाची आशा असणार आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना शनिवारी 13 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडिया चौथ्या विजयासाठी उत्सूक

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 4 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघ वनडे वर्ल्ड आणि आशिया कप स्पर्धेनिमित्ताने एकूण 4 सामन्यांत आमनेसामने आले आहेत. भारताने अफगाणिस्तान विरुद्ध या 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर उभयसंघातील 1 सामना हा बरोबरीत राहिला होता. त्यामुळे टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध चौथ्यांदा विजयी होण्यासाठी उत्सूक आहे. तर अफगाणिस्तानचा ब्लु आर्मी विरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया आपला दबदबा कायम राखणार की अफगाणिनस्तान चमत्कार करणार? यासाठी सामना शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना