Corona | घरीच थांबा, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारा : अजित पवार

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

Corona | घरीच थांबा, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारा : अजित पवार
| Updated on: Mar 24, 2020 | 3:10 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar On Corona Virus) राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे (Ajit Pawar On Corona Virus) संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असंही ते म्हणाले.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातीलं, परंतू शोभायात्रांचं आयोजन आणि सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

हेही वाचा : ‘जनता कर्फ्यू’नंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला नागरिकही मोठा प्रतिसाद देत आहेत. मात्र, उद्या 25 मार्चला गुढीपाडवा मराठी नववर्ष आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा हा नागरिकांना सामुहिकरित्या साजरा करता येणार (Ajit Pawar On Corona Virus) नाही. मात्र, हा उत्साह राखून ठेवा, देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करु, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुंबईत आणखी एक कोरोना बळी, राज्यातील मृतांचा आकडा चारवर 

मुंबईत आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यूएईहून अहमदाबादला परतलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. महाराष्ट्रातील चौथ्या बळीची नोंद झालेली आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 40
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 12
कल्याण – 5
सांगली – 4
नागपूर – 4
यवतमाळ – 4
नवी मुंबई – 3
अहमदनगर – 2
सातारा – 2
ठाणे -2
पनवेल – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
उल्हासनगर – 1

एकूण 101

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबईत (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
(Mumbai Corona Patient Death)
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई महिला (1) – 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (1) – 23 मार्च
कल्याण (1) – 23 मार्च
ठाणे (1) – 23 मार्च
सातारा (2) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
पुणे (3) – 24 मार्च

एकूण – 101 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च

एकूण – 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Ajit Pawar On Corona Virus

संबंधित बातम्या :

सैनिकांजवळ ढालच नसेल तर युद्ध जिंकणार कसं? पुण्याच्या डॉक्टर तरुणीचे मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांना 9 ट्वीट

मुंबईत आणखी एक ‘कोरोना’बळी, यूएईहून परतलेल्या वृद्धाचा मृत्यू

कोरोनाची चाचणीचं देशातील पहिलं किट पुण्यात विकसित, एकाचवेळी तब्बल 10 हजार टेस्ट शक्य

‘जनता कर्फ्यू’नंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली