AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैनिकांजवळ ढालच नसेल तर युद्ध जिंकणार कसं? पुण्याच्या डॉक्टर तरुणीचे मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांना 9 ट्वीट

संशयितांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधनांची कमरता असल्याचं पुण्याच्या डॉक्टर श्वेता यांनी ट्विटरवर लिहिलं आहे (Pune Doctor tweets to Rajesh Tope)

सैनिकांजवळ ढालच नसेल तर युद्ध जिंकणार कसं? पुण्याच्या डॉक्टर तरुणीचे मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांना 9 ट्वीट
| Updated on: Mar 24, 2020 | 1:32 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील पहिला कोरोनाग्रस्त सापडून 15 दिवस झाले, तरी पुण्यात इंटर्न डॉक्टरांसाठी पुरेसे मास्क, सँनिटायझर उपलब्ध नाहीत, असा दावा पुण्याच्या डॉक्टर तरुणीने ट्वीटरवर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून 9 ट्वीट डॉ. श्वेता यांनी केले आहेत. (Pune Doctor tweets to Rajesh Tope)

‘मी सिव्हील हॉस्पिटलमधील इंटर्न आहे. आम्ही डॉक्टर म्हणून 5 मार्चला शपथ घेतली. चार दिवसातच पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली अन् 11 मार्चपासून आमची ड्युटी सुरु झाली. आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवलंय याची मला व माझ्या सहकाऱ्यांना कल्पनाही नव्हती.’ असं डॉ. श्वेता यांनी पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्याला जोडून नऊ ट्वीट केले आहेत.

कोरोना संशयित रुग्णांसाठी सिव्हीलमध्ये विलगीकरण कक्ष कार्यान्वित केला गेला. इथल्या संशयित रुग्णांचं sampling चं काम इंटर्नकडेच. सर्जिकल मास्क, सँनिटायझर यांचा तुटवडा आहे किंवा N95 मास्क्स अजूनही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीतही कोणी काम टाळलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोना स्क्रीनिंग, थर्मल टेस्ट आम्ही करतो, संशयितांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारतो; मात्र हे करत असताना आमच्या स्वसुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची कमरता आहे, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे.

आज जेव्हा आपण स्टेज 3 मध्ये जात आहोत, तेव्हा आपली वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज हवी आहे. सैनिकांजवळ लढण्यासाठी ढालच नसतील तर युद्ध जिंकणार कसं? कोरोना विरुद्ध PPE कीट आमची ढाल आहे. ते नाही तर किमान N95 मास्क, सँनिटायझर पुरेसे उपलब्ध व्हावेत ही माफक अपेक्षा डॉ. श्वेता यांनी व्यक्त केली आहे. (Pune Doctor tweets to Rajesh Tope)

चीनप्रमाणे इतर रुग्णांपासून स्वतंत्र असे कक्ष उभारण्याची गरज आहे. कोरोनासाठी isolation wards वाढवण्याची गरज आहे. व्हेंटीलेटरची व्यवस्था केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आपत्कालीन परिस्थितीत चांगलं नेतृत्व करत असून आमचे आधारस्तंभ आहेत. तरी आमचे हे मूलभूत प्रश्न आपण सोडवाल अशी तमाम डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला अपेक्षा आहे आणि तरच या कोरोना नावाच्या शत्रूशी आपण यशस्वीपणे लढू शकू, असा विश्वासही डॉ. श्वेता यांना वाटतो.

(Pune Doctor tweets to Rajesh Tope)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.