AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : राजभवनात राष्ट्रवादी अन् भाजपचे नेते दाखल, शपथविधीची जोरदार तयारी

राज्यात वर्षभरानंतर पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीत नवीन पक्ष येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या गटासह सरकारमध्ये सहभागी होत आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट आला आहे.

Ajit Pawar : राजभवनात राष्ट्रवादी अन् भाजपचे नेते दाखल, शपथविधीची जोरदार तयारी
raj bhavan
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 02, 2023 | 2:46 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले आहे. ते आता शिवसेना आणि भाजपचा युतीत सामील होणार आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यांसोबत नऊ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. राजभवनावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् भाजपचे नेते एकत्र दिसत आहे. राज्यात आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहे.

राजभवनात  नेते दाखल

राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अन् भाजप नेते आशिष शेलार दाखल झाले आहे. राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते दाखल झाले आहे. त्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश आहे. या शपथविधी समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वो शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु शरद पवार यांचे निकवर्तीय अजित पवार यांच्या गटात दाखल झाले.

सकाळी काय झाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी सकाळी बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अनेक आमदार सहभागी झाले होते. अजित पवार यांच्या निवासस्थानी तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी आली. त्याबातमी पाठोपाठ अजित पवार यांचे स्वीय सहायक राजभवनात दाखल झाले आहे. राजभवनात शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अन् भाजपचे नेते एकत्र राजभवनावर दिसून येत आहे.

संध्याकाळी होणार शपथविधी

रविवारी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी नऊ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यात छगन भुजबळ यांचा समावेश आहे. छगन भुजबळ, धनजंय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे हे नेते मंत्रीपदाची शपथ घेणार  आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ३० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु शरद पवार यांनी ते बंड मोडून काढले होते.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग