Shivsena: वाऱ्यासोबत उडणारी पाने खूप असतात, पण इतिहास मात्र… शिवसेना फुटीबाबत या नेत्याची पोस्ट व्हायरल… कुणाला हाणला सणसणीत टोला?

Operation Tiger Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde: उद्धव सेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. दिल्लीसह राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सहा खासदार हे शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे आणि आज स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी ठाकरे सेनेच्या नेत्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.

Shivsena: वाऱ्यासोबत उडणारी पाने खूप असतात, पण इतिहास मात्र... शिवसेना फुटीबाबत या नेत्याची पोस्ट व्हायरल... कुणाला हाणला सणसणीत टोला?
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 17, 2026 | 10:06 AM

Operation Tiger Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे 19 जून रोजी होणार आहे. त्यात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सेनेच्या 6 खासदारांचा पक्ष प्रवेश करून घेतली, अशी माहिती समोर येत आहे. तर उद्धव सेनेला ऐन वर्धापन दिनाच्या अगोदरच हा मोठा झटका मानल्या जात आहे. सहा खासदार हे दिल्लीत पोहचले आहेत. ऑपरेशन टायगर हे अंतिम टप्प्यात आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना हे खासदार स्वतंत्र गट अथवा शिंदे गटात विलीन होण्याची पत्र देण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाकरे सेनेच्या या नेत्याने या सर्व प्रकाराचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे.

अखिल चित्रे यांची ती पोस्ट व्हायरल

ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांची ती पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. “शिवसेनेला मोठा धक्का’, ‘जोरदार धक्का’, ‘तगडा धक्का’, ‘शिवसेनेत फुट’ अशा मथळ्यांचे कारखाने चालवणाऱ्यांसाठी खास, थोडी हवा नक्कीच वेगाने वाहील, काही सुकलेली पाने गळून पडतील आणि इकडे-तिकडे विखुरली जातील. पण जनतेच्या विश्वासाच्या मुळांवर उभा असलेला भक्कम वृक्ष अशा वाऱ्याच्या झोताने उन्मळून पडत नाही. “वाऱ्यासोबत उडणारी पाने खूप असतात, पण इतिहास मात्र मुळांशी एकनिष्ठ राहिलेल्या वृक्षांचाच घडतो.” अशी पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्टमध्ये शिवसेने सोडून जाणाऱ्या खासदारांना जोरदार टोला हाणला आहे. खासदारांवर अखिल चित्रे यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

पक्षात पुन्हा दुफळी माजल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारीच उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला पाच खासदारांनी ऑनलाईन तर चार खासदारांनी ऑफलाईन हजेरी लावली होती. राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा या बैठकीला हजर होते. पण त्याचवेळी पक्षात फुट पडण्याची भीती वर्तवली जात होती. तर ऑपरेशन टायगर फूस झाल्याचा दावा उद्धव सेनेकडून करण्यात आला होता. पण त्यानंतर दोनच दिवसात डाव पालटला. खासदार संजय राऊत यांनी फुटण्यासाठी खासदारांना 15 कोटी देण्यात येणार असल्याचे ट्वीट करून खळबळ उडून दिली. तर खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून पक्षातील कोणत्याही घडामोडींविषयी अगोदरच आक्षेप नोंदवला. त्यामुळे सहा खासदार फुटणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबत

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे दिल्लीत मात्र ठाकरेंसोबतच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या सिन्नर येथील कार्यालयात दैनंदिन कामे सुरू असल्याचे समोर येत आहे. राजाभाऊ वाजे काल तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. मात्र राजाभाऊ वाजे हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. राजाभाऊ वाजे हे ठाकरेंसोबतच राहणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

Follow Us