मुख्यमंत्रीपदाची ‘इच्छा’ जयंत पाटलांना भोवणार का? राष्ट्रवादीकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण

| Updated on: Jan 23, 2021 | 10:33 AM

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होणार असल्याचे वृत्त निराधार आहे. | Jayant Patil

मुख्यमंत्रीपदाची इच्छा जयंत पाटलांना भोवणार का? राष्ट्रवादीकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण
भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही.
Follow us on

मुंबई: राज्याचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवल्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होणार असल्याचे वृत्त निराधार आहे. उलट लवकरच जयंत पाटील राज्यभरात दौरा करणार असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले. (Jayant Patil remain party president NCP clerification)

काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मीदेखील मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत असल्याचं वक्तव्यं केलं होतं. राजकीय वर्तुळात जयंत पाटील यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काही हिंदी प्रसारमाध्यांकडून शरद पवार यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन दूर करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त देण्यात आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मात्र, आता राष्ट्रवादीने जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

जयंत पाटलांचा राज्यव्यापी दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबुत करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. गडचिरोलीतल्या अहेरीपासून २८ तारखेला दौऱ्याला सुरुवात होईल. तर १३ तारखेला नंदूरबारमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. त्यानंतर जयंत पाटील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणच्या दौऱ्यावरही जातील.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले…?

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही: अशोक चव्हाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणाले….

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

(Jayant Patil remain party president NCP clerification)