पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई शहरातील वाढती बांधकाम, गाड्यांची वाढती संख्या यामुळे प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 10:00 AM

मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई शहरातील वाढती बांधकाम, गाड्यांची वाढती संख्या यामुळे प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे. हेच वाढते प्रदूषण लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी महापालिकेने पूर्व द्रुतगती मार्गावर पेल्टोफोरम, सुबाभूळ, पिंपळ आणि फॉक्स टेल पाम या प्रजातींच्या झाडांची लागवड केली होती. घाटकोपर परिसरातही अशाच प्रजातींच्या अनेक झाडांची लागवड करण्यात आली आहे. पालिकेच्या एन. विभाग कार्यालयातील उद्यान विभागामार्फत या झाडांची देखभाल केली जाते.

मात्र काही दिवसांपूर्वी पालिकेचे अधिकारी घाटकोपर पेट्रोल पंपासमोरील झाडांची पाहणी करत होते तेव्हा त्यांना काही झाडे मृतावस्थेत आढळली. पुरेशा पाण्याअभावी किंवा इतर कारणांमुळे झाडे मृत झाली असावीत असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. मात्र पुढील पाहणीदरम्यान त्यांना आणखी 40-50 झाडं अचानक पूर्णपणे सुकून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला. पालिकेच्या एन. विभागातील काही अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या झाडांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्रे पाडून त्यात विष ओतण्यात आले. प्रत्येक झाडावर अशी 5 ते 6 छिद्रं आढळली. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंतनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणाची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.