AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NIA च्या तपासाला मोठं यश, दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली; सचिन वाझेंनी घेतलं मोठ्या अधिकाऱ्याचं नाव?

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यात या दोन्ही वाहनचालकांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. | NIA sachin Vaze

NIA च्या तपासाला मोठं यश, दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली; सचिन वाझेंनी घेतलं मोठ्या अधिकाऱ्याचं नाव?
NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. याप्रकरणातील संशयित सचिन वाझे यांनीच ही माहिती 'एनआयए'ला दिल्याचे समजते.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 15, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) वेगवान तपासामुळे गेल्या काही तासांत अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. याप्रकरणातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांनीच ही माहिती ‘एनआयए’ला दिल्याचे समजते. (Innova and scorpio car outside ambani residence in CCTV footage)

त्यामुळे आता ‘एनआयए’च्या हाती आणखी महत्त्वाची माहिती लागणार आहे. NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यात या दोन्ही वाहनचालकांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्याची गरज असल्याचे या अधिकाऱ्याच्या चौकशीला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. परंतु, NIA लवकरच दोन्ही वाहनचालक आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अटक करेल, असे समजते.

त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करुन अनेक पुरावे समोर आणले आहेत. यामध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्यांचा सचिन वाझे यांच्या गुन्हे तपास शाखेशी (CIU) संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Innova car outside ambani residence in CCTV footage belongs to CIU unit of Mumbai Police)

या कटासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार CIU युनिटच्या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दोन सीसीटीव्ही फुटेज एनआयएला मिळाली आहेत. यापैकी पहिले फुटेज हे 13 मार्चचे आहे. यामध्ये ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दुपारी 3.15 वाजता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी ही कार पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली होती. त्यानंतर ही इनोव्हा ठाण्याला गेली. यादरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यासह संपूर्ण CIU युनिट अडचणीत आले आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

(Innova and scorpio car outside ambani residence in CCTV footage)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला