
भाजप नेते अमित शाह यांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यात कृषीमंत्री कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव आहे. आपल्याकडे यासंदर्भात माहिती आहे. शेतकऱ्यांना भेटायला कृषीमंत्र्यांना वेळ नाही. पण ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. छत्तीसगडमध्ये ऑनलाईन गेमिंगबाबत अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली. परंतु आपल्याकडील नेत्यांवर ही कारवाई होत नाही, हा सरकारचा दुप्पटीपणा आहे, असे शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, राज्यात 650 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतरही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कृषीमंत्री जात नाही. त्यांच्याकडे वेळ नाही. आशा आमदारांना कृषीमंत्री पद दिले आहे. राज्यात कोणाकडे पैशाचे बॅग मिळतात, कोणी विधानभवन परिसरात मारामारी करतो, या पद्धतीने राज्याचे कारभार सुरु आहे.
राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, ठाकरे यांना याचिका, कोर्ट हे विषय नवीन नाही. या याचिका कशासाठी आहेत, महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका दाखल झाल्या आहेत. शिवसेनाप्रमुख म्हणत होते, या पद्धतीच्या याचिका हे आमचे मेडल आहेत. हे पदक आमच्याकडे असले पाहिजे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्यात ट्रम्प यांच्या विधानावरुन केंद्र सरकारला घेणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी केली, हा दावा केला आहे. त्यावर आम्ही प्रश्न विचारणार आहोत, असे राऊत यांनी म्हटले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही सापडले नाही. त्यामुळे अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी आपण करणार आहोत, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका हॉटेलमध्ये दिसले? त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन्ही नेते एका हॉटेलमध्ये होते. परंतु हे दोन्ही नेते भेटले की नाही ते तेच सांगू शकतात. परंतु यामुळे शिंदेंच्या पोटात भितीचा गोळा निर्माण झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले.