OLX वर अमिताभ बच्चन यांची कार विक्रीला, किंमत फक्त…

बॉलिवूडचे महानायक जेष्ठ्य अभिनेते अमिताभ बच्चन हे आपली जुनी गाडी विकत आहेत. जुन्या वस्तू विकणारी वेबसाईट OLX वर त्यांनी आपल्या गाडीचा फोटो पोस्ट केला आहे.

OLX वर अमिताभ बच्चन यांची कार विक्रीला, किंमत फक्त...
| Edited By: | Updated on: Jun 13, 2019 | 7:29 PM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक जेष्ठ्य अभिनेते अमिताभ बच्चन हे आपली जुनी गाडी विकत आहेत. जुन्या वस्तू विकणारी वेबसाईट OLX वर त्यांनी आपल्या गाडीचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच यामध्ये गाडीचा मालक म्हणूनही अमिताभ बच्चन यांचे नाव दिले आहे. यामुळे अमिताभ यांच्या जुन्या कारची जोरदार चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्येदिसत आहे.

अमिताभ यांना गाड्यांची खूप आवड आहे, हे तर सर्वांना माहित आहे. अमिताभ यांच्याकडे अनेक लक्जरी कारचा समावेश आहे. यामध्ये लँड रोव्हार, रेंज रोव्हर, लिक्सस आणि बेंटले कॉन्टिनेंटल जीटी या गाड्या अमिताभ यांच्याकडे आहेत. वेळेसह अमिताभही अपग्रेड राहणे पसंत करतात म्हणून ते आपली जुनी गाडी विकत आहेत. जुनी गाडी ते 9.99 लाख रुपयात विकत आहे.

अमिताभ बच्चन विकत असलेल्या गाडीतून बच्चन यांनी अनेकदा प्रवास केला आहे. ही गाडी थर्ड ओव्हनरद्वारे विकली जात आहे आणि त्यामुळेच या कारची किंमत कमी ठेवली आहे.

ही कार 2007 मधील Mercedes-Benz S-Class 350 L मॉडल आहे. येथे L चा अर्थ एक्स्ट्रा व्हील बेस. तसेच OLX वर विकत असलेल्या कारच्या पोस्टमध्ये दावा करम्यात आला आहे की, या गाडीचे मालक अमिताभ बच्चन आहेत.

दरम्यान, यावर अजून अमिताभ यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण ही कार जर नक्कीच अमिताभ यांची असेल, तर नक्कीच अनेक चाहते त्यांची ही गाडी खरेदी करण्यासाठी तयार असतील.