मुंबईच्या यलो गेट समुद्राजवळ एक अनोळखी जहाज आढल्याने खळबळ

बईच्या यलो गेट समुद्राजवळ(Mumbai's Yellow Gate sea) एक अनोळखी जहाज(unknown ship) आढल्याने पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. हे जहाज कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. डॉमेस्टिक क्रूझ टर्मिनसजवळ हे अनोळखी जहाज आढळले. येलोगेट पोलीस आणि कस्टम विभागाकडून याची तपासणी सुरू आहे.

मुंबईच्या यलो गेट समुद्राजवळ एक अनोळखी जहाज आढल्याने खळबळ
| Updated on: Aug 22, 2022 | 6:16 PM

मुंबईः  रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (Harihareshwar) समुद्र किनाऱ्यावर एक संशयीत बोट सापडली होती. गंभीर बाब म्हणजे या बोटीत तीन एके 47 रायफल आणि 600 जिवंत काडतुसं सापडल्याने खळबळ उडाली. राष्ट्रीय तपास यंत्रणा, कस्टम, एटीएस, क्राइम ब्रान्च तसेच स्थानिक पोलिस या तपासात लागले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाकडे या तपासाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता मुंबईच्या यलो गेट समुद्राजवळ(Mumbai’s Yellow Gate sea) एक अनोळखी जहाज(unknown ship) आढल्याने पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. हे जहाज कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. डॉमेस्टिक क्रूझ टर्मिनसजवळ हे अनोळखी जहाज आढळले. येलोगेट पोलीस आणि कस्टम विभागाकडून याची तपासणी सुरू आहे. कस्टम विभागाने जहाज ताब्यात घेऊन याची तपासाणी सुरु केली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.