दिनेश दुखंडे, मुंबई : शिवसैनिक म्हाडाच्या बीकेसीतील (Shivsainik mhada bkc) कार्यालयात घुसले आहेत. अनिल परबांच्या (ANIL PARAB) कार्यालयावरुन यांना जाब विचारणार असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम आज पाडण्यात आलं, तिथं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतल्यापासून महाराष्ट्रातील (maharashtra politics) राजकारण चांगलचं तापलं आहे.