26/11 हल्ला : पाकच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी

26/11 हल्ला : पाकच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. मेजर अब्दुल रहेमान पाशा आणि निवृत्त मेजर इकबाल अशी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची नावं आहेत. मेजर अब्दुल रहेमान पाशा आणि निवृत्त मेजर इकबाल या दोघांनाही मुंबई गुन्हे शाखेने ‘मोस्ट वाँटेड’ म्हणून घोषित केले आहे.

हेडलीच्या जबाबनंतर या दोघांचा मुंबईतील हल्यातील सहभाग उघड झाला, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सत्र न्यायालयात दिली. हेडली सध्या अमेरिकेतील तुरुंगात बंदिस्त असून, त्याने व्हिडीओ कॅान्फरसिंगमध्ये पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांबाबत माहिती दिली होती.

26/11 च्या हल्ल्याआधी रेकी करणाऱ्या आरोपी हेडलीच्या मेल आणि CDR मध्ये मेजर अब्दुल रहेमान पाशा आणि निवृत्त मेजर इकबाल यांची नावं सापडली होती.

‘26/11’ पुन्हा झाल्यास युद्ध निश्चित!

26/11 चा मुंबई हल्ला

मुंबईवर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या 10 दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 166 लोकांनी आपला जीव गमावला होता, यात काही अमेरिकी नागरीक देखील मृत्यूमुखी पडले. या 10 दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं, तर अजमल कसाबला पोलिसांनी जीवंत पकडलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

वाचा – सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा कसाबला जिवंत पकडणाऱ्या अधिकाऱ्याच्या हाती

Published On - 2:25 pm, Sun, 3 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI