श्रीमंत महापालिकेचं घोडं वराती मागून धावतंय! शालेय साहित्य खरेदीतील विलंबावरुन आशिष शेलारांचा मुंबई महापालिकेवर निशाणा

| Updated on: Jun 26, 2022 | 5:30 PM

महानगरपालिकेचा कारभार म्हणजे सगळ्याबाबत विलंब असून या कारभारामुळेच शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले नाही असंही त्यांनी म्हटले आहे. महानगरपालिका आणि राजकारणामुळे गरीबांच्या पोरांना नाही दप्तर, नाही पुस्तक, नाही वह्या,नाही रेनकोट, नाही छत्री,असंही त्यांनी या ट्विट केले आहे

श्रीमंत महापालिकेचं घोडं वराती मागून धावतंय! शालेय साहित्य खरेदीतील विलंबावरुन आशिष शेलारांचा मुंबई महापालिकेवर निशाणा
आशिष शेलार, आमदार
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबईः राज्यासह मुंबईतील शाळा (Municipal school) सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत तरीही मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) शाळेतील मुलांसाठीची शालेय साहित्य अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वस्तरातून टीका होत असतानाच भाजपचेच आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवत श्रीमंत महापालिकेचं घोडं वराती मागून धावतंय असं म्हणून शालेय साहित्य खरेदीबद्दल विलंब झाल्यामुळे त्यांनी ट्विट (Ashish Shelar Twitt) करत मुंबई महानगरपालिकेवर टीका केली आहे.

 

शालेय साहित्य खरेदीला मुहूर्त नाही

तब्बल 50 कोटी खर्च करुन करण्यात येणारी मुंबई महापालिका शाळेतील मुलांसाठीची शालेय साहित्य खरेदी अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत मुंबई महानगरपालिकेचा कारभारावर बोट ठेवले आहे. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय साहित्य खरेदीबाबत अजून पालिकेला खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही असा, त्यामुळे आता खरेदी झाली तरी त्या साहित्याचे वाटप पूर्ण होईपर्यंत तिमाही परीक्षा देण्याची वेळ येईल असं म्हणत त्यांनी महानगरपालिकेच्या राजकारणावर आणि त्या कंत्राटदाराबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्त्यामुळे महानगरपालिकेचा कारभार म्हणजे वरतीमागून घोडे असं म्हटले आहे.

गरीबांच्या पोरांना नाही दप्तर

महानगरपालिकेचा कारभार म्हणजे सगळ्याबाबत विलंब असून या कारभारामुळेच शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले नाही असंही त्यांनी म्हटले आहे. महानगरपालिका आणि राजकारणामुळे गरीबांच्या पोरांना नाही दप्तर, नाही पुस्तक, नाही वह्या,नाही रेनकोट, नाही छत्री,असंही त्यांनी या ट्विट केले आहे.

प्रशासन आणि राजकारण

महानगरपालिकेच्या प्रशासन आणि राजकारणावर टीका करताना आशिष शेलार यांनी सरकार आणि कंत्राटदार यांच्यामुळेच शालेय साहित्य वाटपाबाबत मुंबई महानगरपालिका अनास्था दाखवत असल्याचे सांगत त्यांनी बहुतेक यांचे कंत्राटदारा सोबत “ठरतंय” अशी टीका ट्विटद्वारे केली आहे. त्यामुळेच त्यांनी मुंबई महानगरपालिका म्हणजे श्रीमंत महापालिकेचे घोडं वराती मागून धावतंय असं त्यांनी म्हटलं आहे.