Ashish Shelar: पुण्यात तलावारीचा साठा सापडला, आता गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का?; शेलार यांचा सवाल

| Updated on: Apr 28, 2022 | 12:17 PM

Ashish Shelar: कोरोना नंतर भव्य दिव्य स्वरूपात भाजपातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे.

Ashish Shelar: पुण्यात तलावारीचा साठा सापडला, आता गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का?; शेलार यांचा सवाल
पुण्यात तलावारीचा साठा सापडला, आता गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का?; शेलार यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पुण्यात तलवारींचा मोठ्या प्रमाणावर साठा सापडला आहे. त्यावरून आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar)  यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. कार्यक्रमात एक तलवार दाखवली म्हणून मोहित भारतीय यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आता महाराष्ट्रात (maharashtra) ज्या पध्दतीने तलवारीचा साठा सापडलाय त्यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. राज्यातील सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असताना दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी हे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका ही आशिष शेलार यांनी व्यक्त केली. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

आशिष शेलार यांनी यावेळी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. कोरोना नंतर भव्य दिव्य स्वरूपात भाजपातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील सोमय्या मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

महाविकास आघाडीला डोस देणार

तसेच यावेळी विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “बुस्टर डोस” सभा होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे होणारे तडाखेबाज भाषण म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना “बुस्टर डोस” असेल तर महाविकास आघाडीला “डोस” असेल असे त्यांनी जाहीर केले. गेल्या काही दिवसात मेट्रोच्या पत्र्याच्या आड लपून भाजपाच्या पोलखोल सभांवर अती “विराट”म्हणजे एक दोन कार्यकर्ते दगड मारीत आहेत, त्याचा समाचार घेऊन मुंबईसह राज्याच्या विषयांवर सत्ताधारी पक्षाला “डोस” देणारी ही सभा असेल, असेही ते म्हणाले.