Sindhudurg Bank Election Result: देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान… आशिष शेलारांचं मालवणीतून ट्विट; आघाडीला दिलं आव्हान

| Updated on: Dec 31, 2021 | 1:06 PM

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

Sindhudurg Bank Election Result: देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान... आशिष शेलारांचं मालवणीतून ट्विट; आघाडीला दिलं आव्हान
ashish shelar
Follow us on

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो… नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या. आम्ही तयार आहोत!, असं आव्हानच शेलार यांनी आघाडीला दिलं आहे.

गड आला, पण…

दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागला आहे. या 19 जागांपैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे राजन तेली आणि महाविकास आघाडीचे सतीश सावंत हे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाची अवस्था गड आला, पण सिंह गेला अशी झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

विजयी उमेदवार

भाजपचे प्रकाश बोडस विजयी
भाजपचे दिलीप रावराणे विजयी
भाजपचे मनीष दळवी विजयी
भाजपचे महेश सारंग विजयी
भाजपचे अतुल काळसेकर विजयी
भाजपचे विठ्ठल देसाई विजयी
भाजपचे बाबा परब विजयी
भाजपचे समीर सावंत विजयी
भाजपचे गजानन गावडे विजयी
भाजपचे प्रज्ञा ढवण विजयी
भाजपचे रवींद्र मडगावकर विजयी

महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी
महाविकास आघाडीचे गणपत देसाई विजयी
महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी
महाविकास आघाडीच्या नीता राणे विजयी
महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी विजयी
महाविकास आघाडीचे आत्माराम ओटवणेकर विजयी

 

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्गाची माती आहे, इथं खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 10 जागा जिंकल्या; आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय भाजपचा जल्लोष

Sindhudurg Bank Election Result | राणेंनी वचपा काढला ! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता, महाविकास आघाडीला जबर हादरा