Balasaheb Thackeray Memorial : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध राज्य सरकार, ‘संघा’चे BMCला पत्र

| Updated on: Apr 13, 2022 | 2:41 PM

राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष काही नवा नाही. या न त्या कारणावरुन दोन्ही सरकारमधील मंत्री,  नेते आरोप प्रत्यारोप करत असतात. अशातच आता  दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरुन पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध राज्य सरकार, असा संघर्ष सुरु झालाय.

Balasaheb Thackeray Memorial : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध राज्य सरकार, संघाचे BMCला पत्र
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष काही नवा नाही. या न त्या कारणावरुन दोन्ही सरकारमधील मंत्री,  नेते आरोप प्रत्यारोप करत असतात. अशातच आता दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray memorial) यांच्या स्मृतीस्थळावरुन पुन्हा एकदा राज्यात भाजप (BJP) विरुद्ध राज्य सरकार (State Goverment) असा संघर्ष सुरु झालाय. संघाची शाखा भरत असलेल्या भूखंडावर दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. त्यामुळं संघाला उपक्रम राबवण्यास अडचणी येत आहेत. 1967 पासून 2007 पर्यंत भूखंडाचं भाडं भरल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. त्यावरुन शिवाजी पार्कमध्ये पर्यायी मोकळा भूखंड संघाला देण्यात यावा, अशी मागणी या पत्रातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार, असं संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमका वाद काय?

शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळं आता राज्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेने शिवाजी पार्क येथे शाखा भरवण्यासाठी वेगळा भूखंड देण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या ठिकाणी संघाची शाखा भरत होती. मात्र, स्मृतीस्थळाच्या वाढत्या व्याप्तीमुळे संघाला शाखा भरवणे अशक्य होत असल्याचा दावा संघाच्या दादर शाखेने केला आहे. तसं पत्र संघाने मुंबई महापालिकेला दिलं आहे. त्यामुळे आता पुन्हा राज्य विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यायाने भाजप असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

2007 पासून भाडं भरलंय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेचा असा दावा आहे की त्यांनी मुंबई महापालिकेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 1967 साली भूखंड भाडेतत्वावर दिला होता. त्या भूखंडाचे भाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2007 पर्यंत भरले आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेनं जमिनीचे आरेखन न केल्याने 2008पासून भाडे थकले आहे. असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या पत्रात म्हटलंय आहे. तर दुसरीकडे महापालिकेला यांदर्भात वारंवार पत्र देण्यात आल्याचंही संघाने दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आलंय. त्यामुळे आता यावरुन पुन्हा राज्य विरुद्ध राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ वाद पेटण्याची शक्यता आहे.

उपक्रम घ्यायला अडचणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरत असलेल्या ठिकाणी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. त्यामुळं संघाला उपक्रम राबवण्यास अडचणी येत आहेत. स्मृतीस्थळामुळं जागेचे आरेखन करणे अवघड होईल, असं संघाच्या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. त्यामुळं शिवाजी पार्कमध्ये पर्यायी मोकळा भूखंड संघाला देण्यात यावा, अशी मागणी संघानं केली आहे.

इतर बातम्या

Dharmaveer: “जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा”; आनंद दीघेंवरील चित्रपटाचा दमदार टीझर

Nanded Rape | चॉकलेटच्या आमिषाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, 60 वर्षांच्या नराधमाला बेड्या

Sharad Pawar On Raj Thackeray : राष्ट्रवादी हा जातीय पक्ष आहे? राज ठाकरेंच्या आरोपाला सविस्तर उत्तर देताना शरद पवारांकडून मुंडे-भुजबळांचा संदर्भ