बेळगाव महाराष्ट्राचंच, हा घ्या पुरावा! मुख्यमंत्र्यांकडून पुरावे

सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ जारी केला आहे (CM Uddhav Thackeray release video on Belgaum).

बेळगाव महाराष्ट्राचंच, हा घ्या पुरावा! मुख्यमंत्र्यांकडून पुरावे
उद्धव ठाकरे

मुंबई : सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारने 50 वर्षांपूर्वी तयार केलेला ‘ए केस फॉर जस्टीस’ हा 35 मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वाना बघण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने डिजीटल स्वरुपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो (CM Uddhav Thackeray release video on Belgaum).

लघुपटात नेमके पुरावे काय?

‘घडली माला अश्रू फुलांची’ या सामाजिक नाटकाचा नोव्हेंबर 1970 मधला मराठीतला फलक, 1939 मधील स्थापन झालेल्या कारवारच्या मराठी महिला मंडळाची बैठक, तत्कालीन म्हैसूर राज्यातील नामांकित नेते आनंद नाडकर्णी यांचे 1912 मधील मराठीतले दत्तक पत्र, कानडा जिल्ह्यातील 1960 मधील पहिले मराठी वृत्तपत्र, 1890 मधला बेळगाव म्युनिसिपालटीने बांधलेल्या पुलावरील मराठीतील शिलाफलक, कोळी पुरुष आणि महिलांची त्या काळाची महाराष्ट्रीय वेशभूषा असे नानाविध पुराव्यांचे प्रभावी चित्रीकरण या लघुपटात पहायला मिळते. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी सीमा प्रश्नासंदर्भात बैठका आणि सभांमधून केलेल्या भाषणांचे व्हिडीओ देखील आपण पाहू शकतो.

सीमाप्रश्नाबाबत 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्राने तयार केलेला ऑडिओ-व्हिडीओ स्वरुपातील हा दस्तऐवज सीमा भागातील आणि बेळगाव शहरातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा, वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन/कीर्तने, नगरपालिका दस्तऐवज, व्यापारी चोपड्या, खतावणी, शीलालेख असे जवळपास हजारो फुटांची लांबी भरेल एवढे चित्रीकरण करुन तयार केलेला हा माहितीपट आहे (CM Uddhav Thackeray release video on Belgaum)..

हा लघुपट आपण माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या (https://www.youtube.com/MaharashtraDGIPR) यूट्यूब वाहिनीवर https://bit.ly/3r4WHst पाहू शकता.

हेही वाचा : कोट्यवधी युजर्सचा विरोध, तरीही मार्क झुकरबर्गकडून Whatsapp च्या नव्या Privacy policy चं समर्थन

Published On - 11:23 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI