Ramesh Latke : शिवसेनेला मोठा धक्का, आमदार रमेश लटके यांचं निधन

| Updated on: May 12, 2022 | 7:11 AM

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

Ramesh Latke : शिवसेनेला मोठा धक्का, आमदार रमेश लटके यांचं निधन
आमदार रमेश लटके यांचं निधन
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील (Andheri East Assembly constituency) विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला (Dubai) गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. आमदार रमेस लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचं पार्थिक मुंबईत आणण्यासाठी तायरी सुरू असून लवकरच त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत.

नितेश राणेंचं ट्विट

लटकेंची कारकीर्द

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे 1997मध्ये निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

2014मध्ये पहिल्यांदा आमदार

भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. पुढे 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे जगदीश अमीन हे तिसऱ्या स्थानी होते.

विभागातील लोकांवर छाप

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असलेले रमेश लटके यांनी आपल्या विभागातील लोकांवर छाप पाडायला सुरुवात केली. त्यांची लोकप्रियता पाहून शिवसेनेने त्यांना नगरसेवकपदासाठीची उमेदवारी दिली. ते 1997 साली प्रथम मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले.