AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना कोर्टाचे समन्स; काय आहे प्रकरण?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एका जुन्या प्रकरणात समन्स बजावण्यात आलं आहे. कल्याण कोर्टाने ठाकरेंना समन्स बजावत येत्या 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वात मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना कोर्टाचे समन्स; काय आहे प्रकरण?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 10:45 AM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावले आहे. वसंत डावखरे प्रकरणात कोर्टाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले असून त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोर्टात हजर राहणार की वकिला मार्फत आपलं म्हणणं मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वसंत डावखरे यांनी याप्रकरणी कोर्टात दाद मागितली होती. डावखरे आता हयात नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात काय होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांना 22 एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी कल्याण कोर्टाने नोटीस बजावली आहे. 2009मध्ये वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी निवडणूक होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. त्यामुळे कोर्टाने ठाकरेंना समन्स बजावले आहे.

डावखरेंनी व्हिडीओ नाकारला होता

तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. मात्र वसंत डावखरेंनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले होते. हा व्हिडीओ मॉर्फ केल्याचा डावखरे यांचा दावा होता. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा डावखरेंचा आरोप होता. शिवसेनेने हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे डावखरे यांनी थेट कोर्टात जाऊन या प्रकरणात दाद मागितली होती. आता परत या प्रकरणी कोर्टाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावल्याने उद्धव ठाकरे काय बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढे काय होणार?

दरम्यान, वसंत डावखरे या प्रकरणात मुख्य तक्रारदार होते. ते आता हयात नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचे पुढे काय होणार? आणि उद्धव ठाकरे काय बाजू मांडणार हे 5 ऑगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकरणी डावखरे कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. डावखरे कुटुंबीयांच्या भूमिकेवरही हे प्रकरण अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान