मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस सज्ज, 70 रस्ते बंद, 28 रस्त्यांवर नो पार्किंग

| Updated on: Jan 17, 2020 | 8:02 PM

रविवारी (19 जानेवारी) मुंबई मॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉनसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त (police security for mumbai marathon) ठेवण्यात आला आहे.

मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस सज्ज, 70 रस्ते बंद, 28 रस्त्यांवर नो पार्किंग
Follow us on

मुंबई : रविवारी (19 जानेवारी) मुंबई मॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉनसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त (police security for mumbai marathon) ठेवण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या मॅरेथॉनवर सीएए आणि एनआरसी कायद्यांचं सावट आहे. कोणत्याही बाजूने या कायद्याबाबत प्रतिक्रिया उमटू नये अशा सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या (police security for mumbai marathon) असल्याचं समजत आहे.

मॅरथोनच्या दिवशी मुंबईतील 76 रस्ते बंद करण्यात आले आहेत. 28 रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आली आहे. 18 रस्ते पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. 20 पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

मुंबई मॅरेथॉनसाठी ट्रॅफिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असतो. ट्रॅफिकचे 600 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. तसेच 300 ट्रॅफिक वॉर्डन आणि 3000 स्वयंसेवक असणार आहेत.

मुंबई मॅरेथॉन ही मुंबईतील एक मोठी आणि महत्वाची स्पर्धा आहे. 21 किलोमीटर, 11 किलोमीटर, जेष्ठ नागरिक आणि ड्रीम अशा चार प्रकारात या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेत जगभरातील धावपटू सहभागी होत असतात. देशातीलही हजारो धावपट्टू सहभागी होत असतात. यामुळे या स्पर्धेसाठी मोठा बंदोबस्त ठेवला जात असतो.

येत्या रविवारी दक्षिण प्रादेशिक विभाग, मध्य प्रादेशिक विभाग आणि पश्चिम प्रादेशिक विभागात हा बंदोबस्त असणार आहे. पोलसी स्टेशनचे तीन हजार पोलीस असणार आहेत. यामध्ये क्यूआर टी, आरसीपी, एसआरपीएफ पोलिसांचा समावेश असणार आहे.

मॅरेथॉनच्या संपूर्ण रस्त्याची तपासणी बीडीडीएसचे अधिकारी करणार आहेत. तसेच घातपात विरोधी पथकही रस्त्याची तपासणी करणार आहे. यावेळी पोलिसांनाही आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, या स्पर्धेत हजारो लोक सहभागी होत असतात. हे सर्व वेगवेगळ्या विचारधारेचे असतात. सध्या देशात एनआरसी आणि सीएए कायद्या बाबत चर्चा आहे. यामुळे या मॅरेथॉनच्या काळात संबंधित कायद्यांच्या समर्थकांनी तसच विरोधकांनी कोणत्याही प्रकारे पत्रक बाजी करू नये आणि त्यामुळे कोणतीही गडबड होऊ नये याची पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.