सर्वात मोठी बातमी… मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात वॉरंट जारी… ते प्रकरण भोवणार? मोठा धक्का

मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात संजय राऊत मानहानी प्रकरणात न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. राणे यांनी राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते, ज्यामुळे राऊत यांनी मानहानी याचिका दाखल केली. सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने हे वॉरंट काढण्यात आले असून, यामुळे राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सर्वात मोठी बातमी... मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात वॉरंट जारी... ते प्रकरण भोवणार? मोठा धक्का
nitesh rane
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 4:03 PM

राज्याचे मंत्री नितेश राणे चांगलेच अडचणीत आले आहेत. नितेश राणेय यांच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट काढले आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट काढण्यात आले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल काढलेल्या विधानाबद्दल हे वॉरंट काढण्यात आलं आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊतांबद्दल बोलणं राणे यांना चांगलंच भोवणार असल्याचं दिसत आहे. आता यावर राणे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संजय राऊत मानहानी प्रकरणात मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने वारंट काढला आहे. नितेश राणे यांच्या शासकीय निवास स्थानाच्या पत्त्यावर हा वारंट काढण्यात आला आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं नितेश राणे म्हणाले होते. साडे तीन वर्षापूर्वी नितेश राणे यांनी हे विधान केलं होतं. त्याबाबत संजय राऊत यांनी माझ्गाव कोर्टात नितेश राणेंविरोधात मानहानी याचिका दाखल केली होती.

Loading...

दुसरा वॉरंट

मात्र, सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नितेश यांच्या विरोधात कणकवलीतील निवास्थानाच्या पत्त्यावर वारंट काढला होता. गेले तीन महिने कणकवली पोलिसांनी तो वारंट एग्झिक्यूट केला नाही. ही बाब संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे आज न्यायालयाने त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास स्थानाचा पत्त्यावर तो वारंट काढला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

नितेश राणेंची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या प्रकरणावर नितेश राणे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वॉरंट आल्यानंतर नितेश राणे कोर्टाला काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. वॉरंट नंतर तरी नितेश राणे कोर्टात हजर राहतात का? हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

नितेश राणे काय म्हणाले होते?

मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला होता. संजय राऊत हे येत्या दोन तीन आठवड्यात म्हणजे 10 जूनपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या बैठका सुरू आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या अटीवर राऊत एनसीपीत जाण्यास तयार आहेत, असं नितेश राणे म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us