
मुंबई : राज्यासह देशाचं आजच्या आमदारांच्या अपात्र निकालाकडे लक्ष लागलेलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र केलं नाही. या निकालानंतर विरोधकांनी भाजप आणि नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. मात्र हाच निकाल अपेक्षित असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
लोकशाहीमध्ये आकडेवारीला महत्त्व असतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदार आहेत. सर्व नियमाने चालणार आहे. शिवसेनेचा विश्वास निवडणूक आयोगावर नाही. त्यांचा विश्वास मत पेट्यांवर तो उच्च न्यायालयावर नाही. सुरुवातीला देखील निवडणूक आयोगाने हाच निर्णय दिला होता, पक्षाचे नाव चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेंकडे दिले होते त्यामुळे निकाल अपेक्षित असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
निर्णय विरोधात गेला की वाटेल तसं बोलायचं. आजचा निर्णय हा सर्वसामान्य लोकांना अपेक्षित होता. ठाकरे गटाचे आमदारांना अपात्र केलं नाही त्यामुळे ठाकरे गटांनी या निर्णयाचा स्वागत केले पाहिजे ते सोडून अध्यक्ष आणि चुकीचा निर्णय दिला. आमच्या मनासारखा निर्णय झाला नाही म्हणून निर्लज्जपणाचा कळस झाला असे त्यांचे म्हणणे आहे, असं महाजन म्हणाले.
नार्वेकरांनी जो काही निकाल दिला, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत ते स्पष्टपणे धाब्यावर बसवले, पायदडी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जुमानत नाहीत, हे त्यांच्या आजच्या निकालातून स्पष्ट झालं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हा न्यायालयीन निवाडा नाही, हा राजकीय विचारांचा निवाडा आहे, तो जनतेत मांडता येईल. सत्तेचा गैरवापर कसा होतो हे जनतेत मांडू हा कार्यक्रम सुरू होईल. उद्धव ठाकरेंसोबत जे आमदार होते. त्यांनी स्पीकरच्या इलेक्शनमध्ये व्हीप पाळला नाही, म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. तीही मान्य केली नाही. त्यांनाही पात्र ठरवलं आहे. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन बदललण्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.