ठाकरे सरकार नशा बहाद्दरांचे आहे की उत्सवप्रेमींचे; आशिष शेलारांची घणाघाती टीका

एकीकडे हे सरकार बार आणि पब्स सुरु ठेवण्याच्या कालावधीत वाढ करते. मात्र, दुसऱ्या बाजूला उत्सवप्रेमींच्या आनंदात खोडा घालते. | Ashish Shelar

ठाकरे सरकार नशा बहाद्दरांचे आहे की उत्सवप्रेमींचे; आशिष शेलारांची घणाघाती टीका
ashish shelar
| Updated on: Feb 11, 2021 | 8:11 PM

मुंबई: कोरोनाचे कारण पुढे करुन ऐनवेळी राज्यातील उत्सवांवर सरकारकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सरकारला फटकारले. एकीकडे हे सरकार बार आणि पब्स सुरु ठेवण्याच्या कालावधीत वाढ करते. मात्र, दुसऱ्या बाजूला उत्सवप्रेमींच्या आनंदात खोडा घालते, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. (BJP leader Ashish Shelar slams Thackeray govt)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला चांगलेच फैलावर घेतले. माघी गणेशोत्सवासाला केवळ 5 दिवस बाकी असताना 9 फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये गणेशमूर्तीची उंची 4 फुट आणि मंडपांच्या आकारावर ही निर्बंध घातले, असे शेलार यांनी म्हटले.

तयार झालेल्या गणेश मूर्तींचे काय करायचे?

ठाकरे सरकारला गणपती उत्सवाच्या तयारीला किती वेळ लागतो हे माहिती नाही का? गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का? नियम आधीच का जाहीर केले नाहीत? आता तयार झालेल्या मुर्त्यांचे काय करायचे? कोणीही मागणी न करता बार, पब्स रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मोकळीक देणार आणि हिंदुंच्या गणेशोत्सवात मात्र विघ्न घालणार. हे सरकार नशा बहाद्दरांचे आहे की उत्सवप्रेमींचे, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.


शिवजयंतीचा प्लॅन करताय? वाचा कुठले नियम पाळावे लागतील?

1. यंदा गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी
2. मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये
3. केवळ 10 व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये.
4. आरोग्यविषय उपक्रमे आणि शिबीर यांची जनजागृती करावी
5. सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे अधिकचे लक्ष द्यावे
6. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

मिरवणुकीला परवानगी नाही

शिवजयंतीनिमित्त राज्यभरात गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, कीर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सूचवले आहेत.

(BJP leader Ashish Shelar slams Thackeray govt)