Chandrakant Patil: राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग आवरा, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना आवाहन

| Updated on: Apr 21, 2022 | 6:03 PM

Chandrakant Patil: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

Chandrakant Patil: राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग आवरा, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना आवाहन
राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग आवरा, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना आवाहन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी या विधानावरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच आवाहन केलं आहे. अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. राष्ट्रवादीचं (ncp) पुरोगामीत्व हा केवळ आव आहे. त्यांना समाजातील दुर्बल घटकांना टार्गेट करायचं आहे. मग्रुरी दाखवायची ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची पद्धतच असल्याचं ताज्या घटनेवरून स्पष्ट झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुस्लिम अथवा अन्य धर्मियांच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे माहिती नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच

अमोल मिटकरी व्यासपीठावरून पुरोहितांची टिंगल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे जोरात हसून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच आहे. या पक्षाच्या नेत्यांना केवळ विविध समाजघटकांमध्ये भांडणे लाऊन समाजाचे तुकडे करण्यात रस आहे असे दिसते, असंही ते म्हणाले.

 

बेफिकीरीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हिंदू पुरोहितांची जाहीर टिंगल करत असले तरी त्यांना अन्य कोणत्या समाजघटकाबद्दलही आस्था नाही. महाराष्ट्रात 1999 ते 2014 अशी पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही आणि 2019 साली मतदारांचा विश्वासघात करून सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालविले. याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या बेफिकीरीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. दलित – आदिवासींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा घोळही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीनेच केला. पुरोगामीत्वाचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात विविध सामाजिक वर्गांतील दुर्बल घटकांना लक्ष्य करून आपली मग्रुरी दाखवायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पद्धती ताज्या घटनेत दिसली आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Navneet Rana on Hanuman Chalisa: बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा विसर पडलाय का?; नवनीत राणा यांचा शिवसेनेला सवाल

Ganesh Naik Live In Case: नवी मुंबईतल्या बलात्कार प्रकरणी गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार कायम, 27 तारखेला पुढची सुनावणी

Maharashtra News Live Update : किरीट सोमय्या यांच्या कार्यालयावर कार्यवाही करण्याची शिवसैनिकांची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप