Narendra Maheta: भाजप आमदार भूमाफिया? सरकारी पत्रातील त्या उल्लेखाने एकच खळबळ, नरेंद्र मेहता यांच्यावरून काँग्रेस-भाजपत रणकंदन

BJP MLA Narendra Mehta: एका सरकारी पत्रात भाजप आमदाराचा भूमाफिया असा उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात या प्रकरणावरून जुंपली आहे. काय आहे हे प्रकरण?

Narendra Maheta: भाजप आमदार भूमाफिया? सरकारी पत्रातील त्या उल्लेखाने एकच खळबळ, नरेंद्र मेहता यांच्यावरून काँग्रेस-भाजपत रणकंदन
चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील, नाना पटोले
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 1:15 PM

Chandrashekhar Bawankule: सरकारी पत्रातच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा केल्याचे एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांनी हे पत्र पण माध्यमांसमोर आणले. सरकारच्या पत्रातच नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा करण्यात आला आहे. त्यांनी स्टँप ड्युटी बुडवल्याचा गंभीर आरोपही नाना पेटोले यांनी केला आहे. तर या सर्व आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मेहता यांच्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काय आहे हे प्रकरण?

त्या व्हायरल पत्रात काय?

हे पत्र 20 जून 2025 रोजीचे असल्याचे समजते. महसूल खात्याने हे पत्र पाठवले आहे. या पत्रात “भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रक्कमेची पर्यायाने शासनाच्या थकित महसूलाची जलद वसूली करणेबाबत” असा उल्लेख करत 7 दिवसांमध्ये चौकशी करून व सदर विषयाबाबत काय करण्यात आली याची माहिती द्यावी असे म्हटले आहे. तर नाना पटोले यांच्या दाव्यानुसार, या पत्रावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे.

व्हायरल पत्र : 

नाना पटोले यांनी सभागृहात बोलावे

मंत्री म्हणून काम करताना जो विषय तक्रारदाराकडून येतो त्या विषयाला धरून आपण लिहितो, यात आमदार कुठेही लिहिलेले नाही. नरेंद्र मेहता यांचं नाव लिहिलेलं आहे. नाना पटोले हे राजकारणा करत आहेत. यात तक्रार खाली पाठवलेली आहे. नाना पटोले यांच्यावर फार बोलणार नाही. निवेदन आलं की मंत्री म्हणून काम करावं लागतं. आमदार म्हणून नाव नाही, विषय जसा आहे त्या निवेदनाद्वारे ते लिहिलेलं आहे. येत्या ७ दिवसांत या विषयीच्या निवेदनांची चौकशी करून कारवाई होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तक्रारीवर चौकशी मागितली आहे ती होईल. मेहता यांच्याबद्दल १५ पत्र आले आहेत. यापूर्वी १० ते १२ तक्रारी व्यास त्यात नरेंद्र मेहता यांचा दोष आणलेला नाही. मात्र आलेल्या तक्रारीची दाखलही मंत्री म्हणून घेतली जाते. नाना पटेलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे देणे गरजेचे नाही. नानांनी सभागृहात बोलवले. नाना यांनी बोलावं की कांग्रेस ची ओडिसात काय अवस्था झाली आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

सभागृहासमोर पत्र मांडणार

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना स्टॅम्प ड्युटी दिली नाही. तिथल्या आदिवासींच्या जमिनी लाटल्या आहेत. ते सरकारवर दबाव आणत आहेत. भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख पत्रावर करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री यांनी पक्षातील भूमाफिया ओळखले आहेत, असा टोला नाना पटोले यांनी हाणला. तर हे पत्र सभागृहात मांडणार असल्याचे पटोले म्हणाले. याविषयीत आपण कोणतेही राजकारण करत नसल्याचा दावा त्यांनी केला.

कोणताही गैरव्यवहार केलेला नाही 

मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. नाना पटोले यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आमची कोणतीही थकबाकी नाही. माझ्यावरील आरोप हे मोघम आहेत असे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली.

Follow Us